ETV Bharat / business

नव्या वर्षात कॅलेंडरबरोबर बदलणार नवीन नियम, काय होणार तुमच्या खिशावर परिणाम? - NEW YEAR 2025 R

नवीन वर्ष 2025 च्या सुरुवातीसह नवीन नियम लागू होणार आहेत. या सर्व गोष्टींचा तुमच्या अर्थकारणावर परिणाम होणार आहे.

New Year 2025 rules
नवीन वर्षात आर्थिक बदल (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 31, 2024, 9:55 AM IST

हैदराबाद- नवीन वर्षात फक्त वर्ष नाही तर तुमचे अर्थकारणदेखील ( New Year 2025 rules) बदलणार आहे. 1 जानेवारी 2025 पासून काही नवीन नियम लागू होणार आहेत. त्याचा थेट तुमच्या खिशातील पॅकेटवर अथवा पेमेंट गेटवेवर परिणाम होणार आहे.

लक्झरी वस्तूंच्या खरेदीवर अधिक कर भरावा लागेल-नवीन वर्ष 2025 मध्ये तुम्ही लक्झरी वस्तू खरेदी केली तर त्यावर अधिक कर भरावा लागणार आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार जर सूचीबद्ध लक्झरी वस्तुची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्यावर TCS (स्रोत जमा झालेला कर) भरावा लागणार आहे. 1 जानेवारी 2025 पासून नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीसह प्राप्तिकराशी संबंधित अनेक नियम लागू होणार आहेत.

ऑटोमाबाईल कंपन्यांकडून चारचाकीच्या वाहनात दर- ऑटोमाबाईल कंपन्यांनी डिसेंबरमध्ये कारच्या खरेदीवर बंपर सवलत दिली होती. मात्र, 1 जानेवारीपासून बहुतेक कंपन्यांकडून कारच्या विक्रीत लक्षणीय वाढ करण्यात येणार आहे. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. १ जानेवारी 2025 पासून ह्युंदाई, महिंद्रा, टाटा, मारुती सुझुकी, मर्सिडीज-बेन्झ, होंडा आणि ऑडीसारख्या कंपन्या वाहनांच्या किमती ३ टक्क्यांनी वाढविणार आहेत. उत्पादन खर्चात वाढ हे दर वाढविण्याचं कारण असल्याचं ऑटोमाबाईल कंपन्यांनी कारण सांगितलं आहे.

ईपीएफओच्या (EPFO) नियमात बदल- नवीन वर्षात काही गोष्टी तुम्हाला दिलासादायकदेखील असणार आहेत. यातील एक बदल ईपीएफओ (EPFO) ​​पेन्शनशी संबंधित आहे. 1 जानेवारी 2025 पासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) पेन्शन काढण्याच्या नियमात बदल केले आहेत. पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन काढता येणार आहे. यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज भासणार नाही.

UPI 123pa च्या नियमांमध्ये बदल- नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (NPCI) पेमेंट तंत्रज्ञान UPI ​​123Pay ची मर्यादा 1 जानेवारी 2025 पासून वाढविण्यात येणार आहे. यापूर्वी, या पेमेंट सेवेद्वारे जास्तीत जास्त 5 हजार रुपये पैसे पाठविणे शक्य होते. परंतु आता ही मर्यादा जास्तीत जास्त 10 हजार रुपये करण्यात आली आहे. UPI 123Pay या सेवेतून स्मार्टफोन नसलेले कीपॅड फोन वापरणारे नागरिक इंटरनेट कनेक्शनशिवाय यूपीआय पेमेंट करू शकतात.

  • एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ?दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल आणि वायू कंपन्यांकडून एलपीजीच्या किमतीचे दर बदलण्यात येतात. गेल्या काही महिन्यांमध्ये व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढविण्यात आले आहेत. तर घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे स्थिर ठेवण्यात आले आहेत. 1 जानेवारीपासून गॅस सिलिंडरचे दर बदलणार आहेत.

मुदत ठेव नियमांमध्ये बदल- आरबीआयनं नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC) आणि गृहनिर्माण वित्तपुरवठा कंपन्यांसाठी (HFC) मुदत ठेवींशी संबंधित नियम बदलले आहेत. नवीन नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू होतील. या बदलांतर्गत ठेवींची सुरक्षा सुनिश्चित करणे, ठेवी घेणे, तरल मालमत्तेचा काही भाग सुरक्षित ठेवणे आणि ठेवींचा विमा करणे यासारख्या बदलांचा समावेश आहे.

ई-केवायसी नसलेले रेशन कार्ड रद्द होणार-केंद्र सरकारने शिधापत्रिकाधारकांची (रेशन कार्ड) ओळख पडताळण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे. त्यासाठी नागरिकांना ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. जर शिधापत्रिकाधारकांनी या तारखेपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांची शिधापत्रिका १ जानेवारी २०२५ पासून रद्द करण्यात येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून पुन्हा मुदतवाढ होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा-

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.