ETV Bharat / business

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोचं उद्घाटन, तुमच्या आवडत्या कार, बाईक्सच्या दालनाला कशी देणार भेट? - BHARAT MOBILITY EXPO 2025

भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आघाडीच्या कार उत्पादकांचं प्रदर्शन आजपासून सुरू झालंय. या एक्सपोत तुम्हाला विविध कारबद्दल माहिती मिळणार आहे.

Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी (BJP Website)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Jan 17, 2025, 12:07 PM IST

Updated : Jan 17, 2025, 1:30 PM IST

हैदराबाद Bharat Mobility Expo 2025 : दरवर्षीप्रमाणे या वर्षीही भारत मोबिलिटी एक्स्पो आयोजित केला जात आहे, जो देशातील सर्वात मोठा ऑटो शो आहे. हा शो आज सकाळी 10:30 वाजता सुरू झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भारत मंडपम येथे भारतातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कार्यक्रम भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 चं उद्घाटन केलंय. दरवर्षी, भारतातील आणि परदेशातील प्रसिद्ध वाहन उत्पादक ऑटो एक्स्पोमध्ये सहभागी होतात आणि त्यांची उत्पादनं प्रदर्शित करतात. भारत मोबिलिटी एक्स्पो 2025 मध्ये ऑटो एक्स्पो, टायर शो, बॅटरी शो, मोबिलिटी टेक, स्टील इनोव्हेशन आणि इंडिया सायकल शो यांचा समावेश आहे.

कुठं होणार प्रदर्शन
भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये ऑटो उद्योगातील महत्वाच्या कंपन्या सहभगी होताय. नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर जगातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल उत्पादक कंपन्या त्याचं उत्पादन यात सादर करणार आहेत. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज-बेंझ, विनफास्ट तसंच इतर उत्पादक त्यांच्या नवीन आणि आगामी नवोपक्रम प्रदर्शित करतील. ऑटो एक्स्पो मोटर शो 2025 हॉल 1 ते 11 आणि हॉल 14 मध्ये देखील प्रदर्शित केला जाईल. या प्रत्येक हॉलमध्ये प्रत्येक ऑटोमोबाईल उत्पादकाचे विविध प्रदर्शन असतील. या एक्स्पोला पहिल्यांदाच भेट देणाऱ्यांसाठी, गर्दीतून मार्ग काढणं सोपं नसेल. कारण तुम्हला तुमच्या आवडत्या कार आणि ब्रँडचा हॉलमध्ये शोध घ्यावा लागेल. म्हणूनच तुमच्या माहितीसाठी आम्ही शोमधील कार उत्पादकांची यादी तयार केली असून त्यांच्या हॉल प्लेसमेंटनुसार त्यांची क्रमवारी लावली आहे.

भारत मोबिलिटी एक्स्पो 2025 : हॉल 1
हॉल क्रमांक 1 मध्ये तुम्हाला टाटा मोटर्स प्रदर्शन दिसेल. टाटा मोटर्स पॅव्हेलियनचं मुख्य आकर्षण म्हणजे त्यांच्या उत्पादनासाठी तयार सिएरा ईव्ही आणि हॅरियर ईव्ही मॉडेल्सचे प्रदर्शन असेल.

भारत मोबिलिटी एक्स्पो 2025 : हॉल 2
जेव्हा तुम्ही हॉल क्रमांक 2 ला भेट द्याल, तेव्हा तुम्हाला जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडिया आणि होंडा सारख्या उत्पादक कंपन्या तिथं दिसतील. जेएसडब्ल्यू एमजी त्यांच्या पॅव्हेलियनमध्ये आगामी सायबरस्टर आणि एम9 ईव्हीसह काही अतिशय आकर्षक कार प्रदर्शित करणार आहे. याव्यतिरिक्त, शोमध्ये आयएम एल६ लक्झरी सेडान आणि एमजी 7 ट्रॉफी स्पोर्ट फास्टबॅक सारखे मॉडेल देखील प्रदर्शित होतील.

भारत मोबिलिटी एक्स्पो 2025 हॉल ३
हॉल क्रमांक 3 मध्ये किआ, इसुझू, स्कोडा आणि फोक्सवॅगन सारख्या उत्पादक कंपन्याचे दालन असतील. किआ बहुधा त्यांच्या सायरोसचं प्रदर्शन करण्याची शक्यता आहे. तसंच कंपनीकडून EV6 देखील प्रदर्शन दाखवण्यात येईल, अशी चर्चा आहे. स्कोडा ऑक्टाव्हिया व्हीआरएस, नवीन कोडियाक, किलाक, सुपर्ब आणि व्हिजन 7S संकल्पना यांसारखे मॉडेल प्रदर्शित करण्याची शक्यता आहे.

भारत मोबिलिटी एक्स्पो 2025 : हॉल 4
हॉल क्रमांक 4 मध्ये तुम्ही ह्युंदाई आणि मर्सिडीज-बेंझ पॅव्हेलियनची अपेक्षा करू शकता. ह्युंदाई एक्स्पोमध्ये आयोनिक 9 एसयूव्ही आणि स्टारिया एमपीव्हीसह बहुप्रतिक्षित क्रेटा इलेक्ट्रिकचं प्रदर्शन करणार आहे. जेव्हा तुम्ही मर्सिडीज-बेंझकडं वळाल, तेव्हा तुम्हाला नवीन इलेक्ट्रिक जी-वॅगन - G580, कॉन्सेप्ट सीएलए क्लासेस आणि EQS मेबॅक एसयूव्ही 680 'नाईट सिरीज' सारख्या अल्ट्रा-प्रीमियम कार दिसतील.

भारत मोबिलिटी एक्स्पो 2025
हॉल 5मारुती सुझुकी आणि लेक्सस कंपनीच्या कार तुम्हाला हॉल क्रमांक 5 मध्ये दिसतील. यावेळी मारुती सुझुकी ई विटारा प्रदर्शित करणार आहे, जी त्यांची आतापर्यंतची पहिली इलेक्ट्रिक कार आहे. दुसरीकडं, लेक्सस शोमध्ये LF-ZC आणि ROV सारख्ये संकल्पना मॉडेल प्रदर्शित करणार आहे.

भारत मोबिलिटी एक्स्पो 2025: हॉल 6
हॉल क्रमांक 6 मध्ये BMW, Porsche, Toyota आणि BYD सारख्या उत्पादकांचं प्रदर्शन असेल. BMW बहुधा नवीन-जनरेशन BMW X3 प्रदर्शित करेल. याशिवाय, त्यात MINI ब्रँड शोकेस देखील असेल, जिथं ते जॉन कूपर वर्क्स (JCW) पॅकसह कूपर S प्रदर्शित करण्याची शक्यता आहे. पोर्श त्यांच्या पॅव्हेलियनमध्ये टायकन EV, मॅकन EV, 911 GTS, Panamera G, TS आणि 911 GT3 RS सारख्या स्पोर्ट्स कार प्रदर्शित करेल. सर्वात शेवटी, टोयोटा त्यांच्या पॅव्हेलियनमध्ये टोयोटा लँड क्रूझर प्राडो 250 प्रदर्शित करण्याची अपेक्षा आहे.

भारत मोबिलिटी एक्स्पो 2025 : हॉल 14
हॉल क्रमांक 14 मध्ये तुम्हाला VinFast आणि Mahindra कंपन्याची दालन दिसतील. विनफास्ट या शोमध्ये त्यांच्या नवीन उत्पादनांचं प्रदर्शन करणार आहे, ज्यात VF 7, VF 9 आणि VF 3 इलेक्ट्रिक SUV समाविष्ट आहेत. महिंद्रा देखील या शोमध्ये सहभागी होईल आणि अलीकडेच लाँच झालेल्या BE 6 आणि XEV 9 इलेक्ट्रिक SUV सोबत त्यांच्या नवीनतम महिंद्रा XEV e8 (XEV 7e) चं प्रदर्शन करण्याची शक्यता आहे.

हे वाचलंत का :

  1. Bharat Mobility Expo 2025 : दिल्लीमध्ये आजपासून ऑटो एक्स्पो सुरू, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
  2. सॅमसंग दोन स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच करणार, दमदार फीचर्ससह असेल जबरदस्त डिझाईन
  3. महिंद्रा XEV 9e, BE 6 ला BNCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग

Last Updated : Jan 17, 2025, 1:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.