ETV Bharat / bharat

ट्रक दरीत कोसळून भीषण अपघात ; तब्बल 10 व्यापाऱ्यांचा मृत्यू, फळं, भाजीपाल्यांचा झाला 'चिखल' - KARNATAKA ROAD ACCIDENT

कर्नाटकमधील अरबैल घाटात ट्रक दरीत कोसळून तब्बल 10 व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला. हे व्यापारी भाजीपाला आणि फळं घेऊन कुमटा मार्केटला जात होते.

Karnataka Road Accident
ट्रक दरीत कोसळून भीषण अपघात (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 22, 2025, 10:12 AM IST

बंगळुरू : फळं आणि भाजीपाला घेऊन जाणारी ट्रक दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल 10 व्यापाऱ्यांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना बुधवारी सकाळी उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापुरा तालुक्यातील अरबैल घाटातील कागेरी पेट्रोल पंपाजवळ घडली. विशेष म्हणजे या ट्रकमध्ये तब्बल 40 पेक्षा जास्त व्यापारी प्रवास करत होते.

लॉरीत 40 व्यापारी करत होते प्रवास : हावेरी जिल्ह्यातील सावनुरु इथून भाजीपाला आणि फळं घेऊन ४० हून अधिक व्यापारी उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमटा मार्केटला जात होते. यावेळी यल्लापुरा इथल्या अरबैल घाटाजवळ ही ट्रक दरीत कोसळला. त्यामुळे ट्रकमधील 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेत अनेक व्यापारी गंभीर जखमी झाले. या भीषण अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असं घटनास्थळावरील पोलिसांनी सांगितलं.

10 व्यापाऱ्यांचा घटनास्थळी मृत्यू : जखमींपैकी 16 व्यापाऱ्यांना यल्लापुरा तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातात ठार झालेल्या व्यापाऱ्यांचे मृतदेह यल्लापुरा रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. मात्र भीषण अपघात झाल्यानं 10 व्यापाऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.

हेही वाचा :

  1. पुण्यात वाहनांचा तिहेरी भीषण अपघात, मिनी व्हॅनमधील ९ जण ठार
  2. चाकण-शिक्रापूर मार्गावर भीषण अपघात; कंटेनर चालकानं 10 ते 15 जणांना चिरडलं
  3. आयशर पिकअपचा भीषण अपघात; मुंबई आग्रा महामार्गावर 6 कामगार ठार, अनेक जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.