ट्रेनमध्ये सीट न मिळाल्यानं पठ्ठ्यानं हमसफर एक्सप्रेसच्या छतावर झोपून केला 400 किमी प्रवास कानपूरHumsafar Express: आनंद विहार टर्मिनल दिल्लीवरुन गोरखपूरकडे येणाऱ्या हमसफर एक्स्प्रेसच्या बी-11 कोचच्या छतावर पडून एक तरुण दिल्लीहून चक्क कानपूर सेंट्रलला पोहोचला. दिल्लीहून ट्रेन कानपूर सेंट्रल स्टेशनवर पोहोचली तेव्हा प्रवाशांनी त्याला पाहून आरडाओरडा करायला सुरुवात केली. यानंतर आरपीएफनं घटनास्थळ गाठून ओव्हर हेड इलेक्ट्रिक (ओएचई) बंद करुन त्याला खाली आणलं. यामुळं सुमारे 20 मिनिटं रेल्वे वाहतूक ठप्प झाली. ट्रेन कानपूर सेंट्रल स्टेशनवर 50 मिनिटं उभी होती. आरपीएफनं याच तरुणाला अटक करुन तुरुंगात पाठवलंय.
प्रवाशांचा आरडाओरडा : कानपूर सेंट्रल स्थानकावर हमसफर एक्सप्रेस रात्री 12:50 वाजता प्लॅटफॉर्म 9 वर पोहोचली. यावेळी काही प्रवासी ट्रेनमधून खाली उतरले तर काही ट्रेनमध्ये चढत होते. तेव्हा अचानक बी-11 कोचच्या छतावर एक तरुण पडलेला प्रवाशांना दिसला. तरुणाला रेल्वेच्या छतावर पडलेलं पाहून प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केली. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तरुणाला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला.
20 मिनिटे रेल्वे वाहतूक ठप्प : यानंतर उपनिरीक्षक अस्लम खान यांनी ओव्हरहेड इलेक्ट्रिक (ओएचई) बंद करुन तरुणाला खाली आणलं. या काळात स्टेशन परिसर आणि परिसरात 20 मिनिटं गाड्यांची वाहतूक ठप्प होती. छतावर का गेला याबाबत तरुण योग्य उत्तर देऊ शकला नाही. आरपीएफने या तरुणाची व्यवस्थित चौकशी केली असता त्याचं नाव दिलीप कुमार असल्याचं समोर आलं. तो बिंदकी, फतेहपूरचा रहिवासी आहे. आरपीएफ स्टेशन प्रभारी बीपी सिंह यांनी सांगितलं की, हा तरुण डब्याच्या छतावर पडून दिल्लीहून कानपूरला आला होता. तो छताच्या मधोमध उभा राहिला असता तर त्याला ओएचईची धडक बसली असती तर मोठा अपघात झाला असता. या तरुणाला रेल्वेच्या छतावरुन सुखरुप खाली उतरवण्यात आलंय. त्याची चौकशी करुन त्याला कारागृहात पाठवण्यात आलंय.
हेही वाचा :
- Sabarmati Express Accident : अजमेरजवळ रेल्वेचा भीषण अपघात; रेल्वे स्थानकावर उभ्या मालगाडीला धडकली साबरमती एक्सप्रेस
- कहरच! चक्क ड्रायव्हरविना धावली रेल्वे गाडी, कठुआ रेल्वे स्थानकातील प्रकार