पिलीभीत : उत्तर प्रदेश राज्यातील पिलीभीतमध्ये एसटीएफ आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तीन वाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. तीन खलिस्तानवाद्यांनी गुरुदासपूर जिल्ह्यातील पोलीस चौकीवर ग्रेनेडने हल्ला केला होता. त्यानंतर एसटीएफ आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त पथकानं खलिस्तानवादी असलेल्या परिसराला वेढा घातला अन् चकमकीत 3 खलिस्तानवाद्यांना ठार केलंय. ठार झालेले सर्व खलिस्तानवादी हे खलिस्तानी कमांडो फोर्सचे असल्याचं सांगण्यात येतंय. ठार झालेल्या खलिस्तानवाद्यांकडून दोन एके 47 रायफल, दोन ग्लॉक पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त करण्यात आलीत.
पिलीभीतचे एसपी अविनाश पांडेंच्या नेतृत्वाखाली कारवाई : पिलीभीतच्या पुरनपूर कोतवाली भागात ही चकमक झालीय. ठार झालेल्या खलिस्तानवाद्यांमध्ये गुरविंदर सिंग, वीरेंद्र सिंग ऊर्फ रवी आणि जसप्रीत सिंग ऊर्फ प्रताप सिंग यांचा समावेश आहे. चकमकीतील गोळीबारानंतर सर्व जखमी खलिस्तानवाद्यांना पुरनपूर सीएचसीमध्ये नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केले. या घटनेबाबत यूपीचे डीजीपी प्रशांत कुमार म्हणाले की, पिलीभीतचे एसपी अविनाश पांडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आलीय.
Pilibhit, Uttar Pradesh | An encounter took place between a joint team of Uttar Pradesh Police and Punjab Police and three criminals who had thrown grenades at a police post in the Gurdaspur district of Punjab were injured. Later, the three criminals were declared dead. Two AK… pic.twitter.com/3aRCPKNUP5
— ANI (@ANI) December 23, 2024
पोलीस चौकीवर झालेल्या हल्ल्यात तिघेही सामील : पंजाब पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांना हे तीन खलिस्तानवादी जिल्ह्यात लपल्याची माहिती दिली होती. पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील पोलीस चौकीवर झालेल्या हल्ल्यात तिघेही सामील होते. एसटीएफ आणि पंजाब पोलिसांनी तिघांनाही घेरले आणि त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितलं होतं. मात्र, आत्मसमर्पण करण्यास नकार देत तिघांनीही पोलीस पथकावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल तिघांवरही गोळ्या झाडण्यात आल्या. तिघांनाही रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पंजाब आणि यूपीच्या पोलिसांच्या समन्वयाने केलेल्या कारवाईत हे मोठे यश मिळालंय.
हेही वाचा :