नागपूर : येत्या काळामध्ये भारत ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रात मोठी परिवर्तनकारी कामगिरी करण्याची तयारी करत आहे. वर्धान लिथियम (I) प्रा. लि. ही कंपनी देशातील पहिला लिथियम रिफायनरी प्रकल्प नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात उभारण्याची घोषणा कंपनीचे संचालक सुनिल जोशी आणि व्यवस्थापकीय संचालक वेदांश जोशी यांनी केली. ऐतिहासिक प्रकल्पासाठी कंपनीने तब्बल ४२ हजार ५३२ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा ही केलेली आहे. या प्रकल्पामुळे भारताची ऊर्जा व संसाधनांमध्ये आत्मनिर्भरता देखील वाढणार आहे. दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये वर्धान लिथियम कंपनी व महाराष्ट्र सरकारमध्ये करार करण्यात आला आहे.
बुटीबोरी येथील अतिरिक्त एम.आय.डी.सीच्या 500 एकरात ही कंपनी उभारली जाणार आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर भारताची लिथियम आयातीवर अवलंबन देखील मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. एवढंच नाही तर डोमेस्टिक सप्लाय चेन देखील मजबूत होणार आहे. ६० हजार टन रिफायनिंग क्षमतेसह २० GWhबॅटरी उत्पादन देखील होईल,ते वाहनांना, घरांना आणि उद्योगांना ऊर्जा देईल.
‘मेक इन इंडिया’साठी एक गेम-चेंजर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी "मेक इन इंडिया"अंतर्गत हा प्रकल्प आहे. महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये भारताला आत्मनिर्भरता व प्रोत्साहित करण्यासाठी कंपनी कटिबद्धत असल्याचे ही प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. वर्धान लिथियमची भारताच्या वाढत्या लिथियम आधारित उत्पादनांची मागणी पूर्ण करेल.
जागतिक मानकांसह जागतिक दर्जाची तंत्रज्ञान सहकार्य : अमेरिका आणि युरोपमधील प्रतिष्ठित तंत्रज्ञान भागीदारांच्या सहकार्याने वर्धान लिथियमचे नागपूरमध्ये तयार झालेले उत्पादने सर्वात उच्च आंतरराष्ट्रीय मानकांसह असतील अशी ग्वाही देण्यात आली आहे.
परियोजनेच्या मागे दूरदर्शी नेतृत्व :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिवर्तनकारी प्रकल्प राज्यात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. महाराष्ट्राने पहिल्या लिथियम रिफायनरी व बॅटरी उत्पादन सुविधेचे होस्ट केले आहे. या करारावर दावोस येथे स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा :