दुबई Virat Kohli 14000 Runs in ODI : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाचा दुसरा सामना पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान, टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं वनडे क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. विराटनं एका खास यादीत जगातील सर्व फलंदाजांना मागे टाकलं आहे. त्यानं एक असा विक्रम केला आहे जो आतापर्यंत सचिन तेंडुलकरच्या नावावर होता, ज्याला 'क्रिकेटचा देव' असं म्हटलं जातं.
1⃣4⃣0⃣0⃣0⃣ ODI RUNS for Virat Kohli 🫡🫡
— BCCI (@BCCI) February 23, 2025
And what better way to get to that extraordinary milestone 🤌✨
Live ▶️ https://t.co/llR6bWyvZN#TeamIndia | #PAKvIND | #ChampionsTrophy | @imVkohli pic.twitter.com/JKg0fbhElj
विराट कोहलीची ऐतिहासिक कामगिरी : पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात 15 धावा करुन विराट कोहलीनं वनडे क्रिकेटमध्ये आपले 14000 धावा पूर्ण केल्या आहेत. विराट हा जगातील फक्त तिसरा फलंदाज आहे ज्यानं वनडे क्रिकेटमध्ये 14 हजार धावांचा आकडा गाठला आहे. विराटच्या आधी सचिन तेंडुलकर आणि श्रीलंकेचा कुमार संगकारा यांनी ही कामगिरी केली आहे. पण विराट कोहलीनं वनडे सामन्यात सर्वात जलद 14000 धावा पूर्ण केल्या आहेत. सचिन तेंडुलकरनं 359 व्या सामन्यातील 350 व्या डावात ही कामगिरी केली. तर, विराट कोहलीनं 299 व्या सामन्यातील 287 व्या डावात हा कारनामा केला आहे.
𝐑𝐢𝐝𝐢𝐧𝐠 𝐚𝐥𝐨𝐧𝐠𝐬𝐢𝐝𝐞 𝐥𝐞𝐠𝐞𝐧𝐝𝐬 👑
— ICC (@ICC) February 23, 2025
Virat Kohli joins Sachin Tendulkar & Kumar Sangakkara in the 14k ODI runs club 🤩 pic.twitter.com/2GmnWcZzcK
विराट कोहली तिसऱ्या स्थानावर : विशेष म्हणजे विराट कोहलीच्या आधी सचिन तेंडुलकरनंही पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात वनडे सामन्यात 14000 धावा पूर्ण केल्या होत्या. सचिननं 6 फेब्रुवारी 2006 रोजी पेशावर इथं ही कामगिरी केली होती. आता, विराट कोहलीनं दुबईमध्ये पाकिस्तानविरुद्ध हाच पराक्रम पुन्हा केला आहे. वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. कुमार संगकारा 14234 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि सचिन 18426 धावांसह पहिल्या स्थानावर आहे.
वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी डावांमध्ये 14000 धावा करणारे फलंदाज :
- विराट कोहली - 287 डाव
- सचिन तेंडुलकर - 350 डाव
- कुमार संगकारा - 378 डाव
Indian batting talisman Virat Kohli crosses a major milestone to join Sachin Tendulkar and Kumar Sangakkara 👀#PAKvIND #ChampionsTrophy https://t.co/Xznber5ZVT
— ICC (@ICC) February 23, 2025
वनडेत सर्वाधिक शतकं : विराट कोहली हा वनडे क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. त्यानं या फॉरमॅटमध्ये अनेक मोठ्या कामगिरी केल्या आहेत. वनडे सामन्यात सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रमही विराटच्या नावावर आहे. त्यानं आतापर्यंत या फॉरमॅटमध्ये 50 शतकं झळकावली आहेत. या यादीतही त्यानं सचिन तेंडुलकरला मागे टाकलं होतं. सचिन तेंडुलकरनं त्याच्या वनडे कारकिर्दीत 49 शतकं केली. पण 2023 च्या वनडे विश्वचषकात विराट त्याच्या पुढं गेला.
हेही वाचा :