पणजी Water Row PRAWAH :कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यात माधई नदीच्या पाणी वाटपावरुन वाद सुरू आहे. कर्नाटक राज्यात उगम पावणाऱ्या म्हादई नदीच्या पाणी वाटपावरुन कर्नाटक सरकार आक्रमक झालं असताना गोवा राज्य मात्र पाणी देण्यास नकार देत आहे. यामुळे म्हादई नदीच्या पाणी वाटपाचा प्रश्न तापला आहे. त्यातच आता गुरुवारपासून गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत म्हादेई खोऱ्याची पाहणी करतील, असं गोव्याचं मंत्री सुभाष शिरोडकर यांनी वृत्तसंस्थेला बोलताना स्पष्ट केलं. केंद्र सरकारनं म्हादई जल विवाद न्यायाधिकरणाच्या निवाड्याचं पालन करण्यासाठी प्रोग्रेसिव्ह रिव्हर अथॉरिटी फॉर वॉटर अँड हार्मनी (PRAWAH ) ची स्थापना केली.
कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यात म्हादई पाणी प्रश्न पेटला :कर्नाटक राज्यात म्हादेई नदी उगम पावून ती पुढं महाराष्ट्र आणि गोव्यातून अरबी समुद्राला मिळते. मात्र म्हादेई नदीच्या पाण्यावरुन गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यात वाद सुरू आहे. म्हादेई नदी पाणी वाटपाचा प्रश्नावरुन आंतरराज्य पाणी विवाद न्यायाधिकरणाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका गोवा सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. कर्नाटकला म्हादेई नदीचं पाणी वळवण्याची परवानगी दिल्यास प्रभावित होणाऱ्या धबधबे आणि धरणांसह प्रवाह समितीचे सदस्य सर्व ठिकाणांना भेट देतील, असं गोव्याचे जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं.