हैदराबादteachers day 2024-आजची पिढी म्हणजे उद्याचं देशाचं भवितव्य असते. हे देशाचं भवितव्य घडविण्याकरिता शिक्षक विद्यार्थ्यांची जडणघडण करतात. तसेच नीतिमत्तेसारखी अत्यावश्यक मूल्ये रूजविण्याकरिता सदैव कार्यरत असतात. एकप्रकारे आदर्श नागरिक घडविण्यासाठी शिक्षकांचे महत्त्वाचे योगदान असते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबर रोजी भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो. ‘शिक्षकांचे सक्षमीकरण: लवचिकता मजबूत करणे, टिकाऊपणा निर्माण करणे’ ही यंदाची शिक्षक दिनाची संकल्पना आहे.
पहिला शिक्षक दिन सोहळा-डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन देशाचे राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांच्या काही विद्यार्थी आणि मित्रांनी त्यांना 5 सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी मागितली. तेव्हा राधाकृष्णन यांनी माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून पाळला तर हा मला अभिमान वाटेल, असे सांगितलं. डॉ. राधाकृष्ण यांच्या सूचनेनुसार 5 सप्टेंबर 1962 रोजी देशात पहिला शिक्षक दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून राधाकृष्णन यांची जयंती हा शिक्षक दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो.
कोण आहेत डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन-डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी 13 मे 1962 ते 13मे 1967 या काळात देशाचे दुसरे राष्ट्रपती म्हणून जबाबदारी पार पाडली. 5 सप्टेंबर 1888 रोजी आंध्र प्रदेशातील एका लहानशा गावात जन्मलेले राधाकृष्णन हे अत्यंत विद्वान आणि तत्त्वज्ञ होते. त्यांनी देशाच्या राजकारण आणि शैक्षणिक क्षेत्रावर छाप पाडली. राधाकृष्णन यांनी मद्रासच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी म्हैसूर विद्यापीठ आणि कलकत्ता विद्यापीठासह अनेक नामांकित विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांच्या तुलनात्मक धर्म आणि तत्त्वज्ञानावरील कार्यामुळे भारतीय तत्त्वज्ञानाची पाश्चात्य जगाला ओळख झाली. समाजासाठी परिवर्तनाचे साधन म्हणून शिक्षण असते, या तत्वावर त्यांची निष्ठा होती. राधाकृष्णन यांनी 1949 ते 1952 पर्यंत सोव्हिएत युनियनमधील भारतीय राजदूत म्हणून कार्य केले. राष्ट्रपती म्हणून निवड होण्यापूर्वी त्यांनी 1952 ते 1962 पर्यंत भारताचे उपराष्ट्रपती म्हणून काम केले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे 17 एप्रिल 1975 रोजी निधन झाले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे तत्वज्ञानी, शिक्षक, विचारवंत, मानवतावादी व्यक्तिमत्व होते. त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरविण्यात आलं. शिक्षण म्हणणे केवळ बुद्धीचे प्रशिक्षणच नाही तर हृदयाचे शुद्धीकरण आणि आत्म्याची शिस्त आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी जीवनकेंद्रित शिक्षणावर भर दिला. तार्किक विचार आणि सर्जनशीलता वाढवणाऱ्या आधारित अभ्यासक्रमाची गरज असावी आणि मातृभाषेतून शिक्षण द्यावे, असा त्यांचा आग्रह होता. चारित्र्य घडवणं हे शिक्षणाचं प्रमुख उद्दिष्ट असायला हवे, असे त्यांचे मत होते.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 प्राप्त शिक्षकांची यादी
- अविनाशा शर्मा - हरियाणा
- सुनील कुमार - हिमाचल प्रदेश
- पंकज कुमार गोया - पंजाब
- राजिंदर सिंह - पंजाब
- बलजिंदर बराड़ सिंह - राजस्थान
- हुकम चौधरी चंद - राजस्थान
- कुसुम लता गरिया - उत्तराखंड
- चंद्रलेखा दामोदर मेस्त्री - गोवा
- चंद्रेशकुमार भोलाशंकर बोरीसागर - गुजरात
- विनय शशिकांत पटेल - गुजरात
- माधव पटेल प्रसाद - मध्य प्रदेश
- सुनीता गोधा - मध्य प्रदेश
- के, शारदा - छत्तीसगढ़
- नरसिम्हा मूर्ति एचके - कर्नाटक
- द्विति चंद्र साहू - ओडिशा
- संतोष कुमार कर - ओडिश
- आशीष कुमार रॉय - पश्चिम बंगाल
- प्रशांत कुमार मारिक - पश्चिम बंगाल
- उर्फनामीन जम्मू - कश्मीर
- रविकांत द्विवेदी - उत्तर प्रदेश
- श्याम मौर्य प्रकाश यू - उत्तर प्रदेश
- डॉ. मिनाक्षी कुमारी - बिहार
- सुकेंद्र कुमार सुमन - बिहार
- के. सुमा - अंडमान एंड निकोबर द्वीप
- सुनीता गुप्ता - मध्य प्रदेश
- चारू शर्मा - दिल्ली
- अशोक सेनगुप्ता - कर्नाटक
- एच एन गिरीश - कर्नाटक
- नारायणस्वामी.आर - कर्नाटक
- ज्योति पंका - अरुणाचल प्रदेश
- लेफिजो अपोन - नागालैंड
- नंदिता च ओंगथम - मणिपुर
- यांकिला लामा - सिक्किम
- जोसेफ वनलालह्रुआ सेल - मिजोरम
- एवरलास्टी एनजी पाइनग्रोप - मेघालय
- डॉ.नानी जी देबनाथ - त्रिपुरा
- दीपेन खानिकर - असम
- डॉ. आशा रानी - झारखंड
- जिनु जॉर्ज - केरल
- के सिवाप रसद - केरल
- मिडी श्रीनिवास राव - आंध्र प्रदेश
- सुरेश कुनाट - आंध्र प्रदेश
- प्रभाकर रेड्डी पेसरा - तेलंगाना
- थदुरी संपत कुमार - तेलंगाना
- पल्लवी शर्मा - दिल्ली
- चारु मैनी - हरियाणा
- गोपीनाथ आर - तमिलनाडु
- मुरलीधरन रमिया सेथुरमन - तमिलनाडु
- इतिर्नत्रिनु चिन्नी बेडके - महाराष्ट्र
- सागर चित्तरंज एन बागडे - महाराष्ट्र
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील 50 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 प्रदान केले जातील. नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. शिक्षकांना उत्कृष्टतेबद्दल 50,000 रुपयांचे रोख पारितोषिक, एक रौप्य पदक आणि सन्मानपत्र दिले जाईल. कोल्हापुरातील सौ एस.एम. लोहिया हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सागर बगाडे आणि गडचिरोली येथील जिल्हा परिषद (झेडपी) उच्च प्राथमिक डिजिटल शाळा जाजवंडी येथील मानतय्या बेडके यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.