महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरक्षा दलाची मोठी कारवाई; चकमकीत 29 नक्षलवादी ठार - Naxalites Encounter in Chhattisgarh

Naxalites Encounter : लोकसभा निवडणुकांपूर्वीच छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत तब्बल 29 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलंय. या कारवाईला प्रशासनानं दुजोरा दिलाय.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 16, 2024, 7:00 PM IST

Updated : Apr 16, 2024, 8:05 PM IST

माहिती देताना पोलीस अधिकारी

(कांकेर) छत्तीसगड Naxalites Encounter : मंगळवारी कांकेरच्या छोटाबेठिया येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 29 नक्षलवादी ठार झाले आहेत. सुरक्षा दलाकडून परिसरात शोधमोहीम सुरू आहे. बस्तरच्या आयजींनी 18 नक्षलवाद्यांच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिलाय. सुरुवातीला 18 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. मात्र, आता तो आकडा वाढला असून 29 नक्षलवादी ठार झाले आहेत.

29 नक्षलवादी ठार : लोकसभा निवडणुकीपूर्वी नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी सुरक्षा दलांनी कांकेरमध्ये मोठी कारवाई केलीय. कांकेरच्या छोटाबेठिया येथे नक्षलविरोधी मोहिमेवर निघालेले जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरुवातीला 18 नक्षलवादी ठार झाले होते. त्यानंतर ही संख्या वाढली आहे. बस्तरच्या आयजींनी याला दुजोरा दिलाय.

पोलीस प्रशासनानं दिला दुजोरा : "कांकेरच्या छोटाबेठियामध्ये शोधकार्यादरम्यान सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत 29 नक्षलवादी ठार झाले. सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. या चकमकीत तीन जवान जखमी झाले आहेत. तिघांची प्रकृती ठीक आहे. नक्षलवाद्यांच्या मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे," अशी माहिती बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी दिली. घटनास्थळावरून अनेक आधुनिक शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत. कांकेर डीआरजी आणि बीएसएफ टीमनं ही चकमक पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याची माहिती आयजींनी दिली.

सुरक्षा दलांना मोठे यश : कांकेरचे एसपी कल्याण अलीसेला यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितलं की, "कांकेरमधील छोटेबेठिया नक्षल चकमकीत 29 नक्षलवादी ठार झाले आहेत. शोध मोहीम अद्याप पूर्ण झालेली नाही. मृतांचा आकडा वाढू शकतो. टॉप नक्षलवादी कमांडर शंकर राव याच्यावर २५ लाखांचे बक्षीस होते. याशिवाय अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत."

पोलीस प्रशासन सतर्क : राज्यात नक्षलवादाच्या घटना सातत्यानं घडत आहेत. नक्षलवाद्यांच्या वाढत्या कारवायामागं निवडणुका हेही कारण मानले जात आहे. त्यामुळंच निवडणुकीच्या संदर्भात पोलीस आणि जवान आधीच सतर्क आहेत. त्याचाच परिणाम म्हणून सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर मोठा हल्ला केला आणि ठार केलं.

हेही वाचा -

  1. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापूर्वी छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, चकमकीत ९ नक्षलवादी ठार - Bijapur Naxal Encounter
  2. Bastar the naxal story : 'बस्तर-द नक्सल स्टोरी' स्पेशल स्क्रीनिंगदरम्यान दोनदा वीज खंडित झाल्यानं जेएनयूमध्ये गोंधळ
  3. हिदूर जंगलातील चकमकीत नक्षलवादी ठार, बस्तर फायटरच्या जवानाला वीरमरण
Last Updated : Apr 16, 2024, 8:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details