महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारतीय शूजला रशियन सैन्याची 'डिमांड'; 'या' ठिकाणी बनवले जातात शूज - Supply Shoes to Russian Army

Supply Shoes to Russian Army : रशियन सैन्यासाठी सुरक्षा शूजची निर्मिती भारतात करण्यात येत आहे. बिहार राज्यातील हाजीपूर स्थित 'कॉम्पिटन्स एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीनं युरोपियन बाजारपेठांसाठी शूज तयार करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला ठसा उमटवला आहे.

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 9, 2024, 6:33 PM IST

Supply of safety shoes to the Russian army
रशियन सैन्याला सुरक्षा शूजचा पुरवठा (ETV Bharat Reporter)

वैशाली(बिहार) Supply Shoes to Russian Army :आपण (भारत) रशियाकडून शस्त्रास्त्रं तसंच दारूगोळा खरेदी करतो, पण त्या बदल्यात रशियन सैन्य भारतातून अनेक आवश्यक वस्तू आयात करते. त्यापैकी एक आहे हाजीपूर शूज. बिहारी शूज ही रशियन सैन्याची पहिली पसंती आहे. रणांगण असो किंवा बर्फाळ मैदान, हाजीपूरच्या खास बनवलेल्या बुटांवर रशियन सैन्याचा 'भरवसा' आहे. अगदी हाडं गोठवणाऱ्या थंडीतही ते रशियन सैन्याच्या पायाचं रक्षण करतात. ही कंपनी हाजीपूरच्या औद्योगिक परिसरात आहे.

शूज तयार करताना कर्मचारी ((ETV BHARAT NATIONAL DESK))

हाजीपूरमध्ये बनतात रशियन सैन्याचे शूज : 'कॉम्पिटन्स एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड'चे महाव्यवस्थापक शिव कुमार रॉय सांगतात, "2018 मध्ये हाजीपूरमध्ये आम्ही कंपनी सुरू केली. आमचा मुख्य उद्देश स्थानिकांना रोजगार देणं आहे. हाजीपूरमध्ये आम्ही सेफ्टी शूज बनवतो, जे रशियाला एक्सपोर्ट करायचे आहेत. सध्या रशियाला शूजची निर्यात करत आहोत. आम्ही हळूहळू युरोपीय बाजारपेठेकडं वाटचाल करत आहोत. लवकरच देशांतर्गत बाजारातही आम्ही लॉन्च होणार आहोत."

रशियन सैन्यासाठी सुरक्षा शूज तयार केले जात आहेत ((ETV BHARAT NATIONAL DESK))

रशियन सैन्याच्या गरजा या कमी वजनाचे, स्लिप-प्रतिरोधक शूज आहेत. हे शूज अत्यंत खराब हवामानाचा सामना करण्यास सक्षम असले पाहिजेत. ती परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही सेफ्टी शूज बनवतो. केवळ हाजीपूरमध्येच नाही, तर आम्ही रशियाचे भारतातील सर्वात मोठे निर्यातदार आहोत. आम्हाला आशा आहे की, ही संख्या दिवसेंदिवस वाढेल. - शिवकुमार रॉय, महाव्यवस्थापक, कॉम्पिटन्स एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड

कंपनीतील 300 कर्मचाऱ्यांपैकी 70 टक्के महिला आहेत. ((ETV BHARAT NATIONAL DESK))

कोटींची निर्यात : "महिलांना जास्तीत जास्त रोजगार देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. 300 कर्मचाऱ्यांपैकी 70% महिला आमच्या कामगार आहेत. आम्ही गेल्या वर्षी 1.5 दशलक्ष शूज जोड्या निर्यात केल्या आहेत. याची किंमत 100 कोटी रुपये आहे. पुढील वर्षी 50 टक्क्यांनी निर्यात वाढण्याची आशा आहे," असं शिवकुमार रॉय यांनी सांगितलं. त्यामुळं बिहारमधील शूजचा रशियामध्ये डंका वाजतोय.

रशियन सैन्यासाठी डिझाइनर शूज ((ETV BHARAT NATIONAL DESK))

पुढच्या महिन्यात काही कंपन्या कारखान्याला भेट देतील अशी आम्हाला आशा आहे. बिहारमध्ये विशेषत: हाजीपूरमध्ये फॅशन उद्योग सुरू करणं हे एक आव्हान आहे. परंतु सरकारच्या पाठिंब्यामुळं आम्हाचा आत्मविश्वास वाढत आहे. - मजहर पल्लुमैया, फॅशन डेव्हलपमेंट आणि मार्केटिंगचे प्रमुख

रशियन सैन्याच्या पायात भारतीय बूट (ETV BHARAT NATIONAL Desk)

फॅशनेबल शूज युरोपमध्ये लोकप्रिय : "फ्रान्स, इटली, स्पेन, यूके येथील बाजारपेठा आमची मुख्य ताकद आहेत. आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी उच्च श्रेणीचे शूज विकसित करणं आमचं ध्येय आहे. आम्ही अलीकडंच बेल्जियमच्या एका कंपनीशी बोलणी सुरू केली आहे. सुरुवातीला परदेशी कंपन्यांना काही शंका होत्या, पण जेव्हा त्यांनी शूजचा नमुना घेतला तेव्हा त्यांची खात्री पटली," असं मजहर पल्लुमैया यांनी सांगितलं.

हाजीपूरच्या या कंपनीत रशियन आर्मीचे शूज बनवले जातात (ETV BHARAT National Desk)

'हे' वाचलंत का :

  1. ओलानं गुगल मॅप सोबतचे संबंध तोडले; लाँच केलं स्वतःचं ओला मॅप - OLA Maps launched
  2. बजाजने सादर केली जगातील सर्वांत पहिली CNG बाईक; बजाज 'फ्रीडम'चे गडकरींच्या हस्ते अनावरण - CNG Bike Bajaj Freedom
  3. 'बूस्टमायचाईल्ड'ला मिळाला बूस्टर डोस : वर्धन ग्रुपनं केली एक कोटीची गुंतवणूक - BoostMyChild app

ABOUT THE AUTHOR

...view details