महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शहापूर तालुक्यात पुराचे थैमान; पुरामध्ये अडकलेल्या १५१ पर्यटकांना एनडीआरएफच्या पथकाने सुखरूप बचावले; शेकडो घरे पाण्याखाली - Maharashtra live news updates

Maharashtra live news
Maharashtra live news (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 7, 2024, 8:39 AM IST

Updated : Jul 7, 2024, 3:40 PM IST

'ईटीव्ही भारत महाराष्ट्र'चे हे लाईव्ह पेज दिवसभर अपडेट होत असते. राज्य, देश आणि विदेशातील सर्व महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला या पेजवर पाहता आणि वाचता येतील. सर्वात पहिली आणि खात्रीशीर बातमी तुम्हाला या पेजवर वाचायला मिळेल. त्यासाठी ईटीव्ही भारतच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

ईटीव्ही भारत वेबसाईट लिंक

LIVE FEED

3:26 PM, 7 Jul 2024 (IST)

शहापूर तालुक्यात पुराचे थैमान

ठाणे :- शहापूर तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने नदी, नाले, ओढ्यांना पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात एका फार्म हाऊस पावसाळी सहलीसाठीआलेल्या १५१ जण अडकली होती. त्यांना सुखरूपपणे एनडीआरएफच्या पथकाने बचावले. मात्र या पुराचा फटका तालुक्यातील शेकडो घरांना बसला असून ती नदी काठचे घरे पाण्याखाली गेल्याने नागरीकांचे हाल झाले आहे.

2:08 PM, 7 Jul 2024 (IST)

पंचगंगा यंदा पहिल्यांदाच पात्रा बाहेर; पंचगंगेची पाणीपातळी पोहचली 28 फूट 7 इंचावर

जिल्ह्यात धरण क्षेत्रात गेल्या आठवड्याभरापासून पाऊस धुमाकूळ घालत आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ही झपाट्याने वाढ होत असल्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही हाय अलर्टवर आहे. मुसळधार पावसाने पंचगंगा नदी आपल्या यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर पडली असून राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पाणी पातळी आज दुपारी 12 वाजता 28 फूट 7 इंच नोंदली गेली.

1:41 PM, 7 Jul 2024 (IST)

नवी मुंबई, ठाणे आणि पनवेलमध्ये मुसळधार पाऊस, अनेक भागात साचलं पाणी

नवी मुंबई, ठाणे आणि पनवेलमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं अनेक भागात पाणी साचलं आहे. आदई, सुकापूर भागातील गावे पूर्णपणे जलमय झाली आहेत. रस्ते आणि सोसायट्यांमध्येही पाणी साचल्यांना नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कळंबोली परिसरातील रस्ते पाण्याखाली गेल्यानं पुराचा धोका वाढला आहे. रस्त्यावर अनेक वाहने अडकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

12:55 PM, 7 Jul 2024 (IST)

हिट अँड रनमधील प्रकरणात अटक करून कडक शिक्षा करा, राजकीय रंग नको-आदित्य ठाकरे

हिट अँड रनमधील प्रकरणात अटक करून कडक शिक्षा करा. दुर्घटनेला राजकीय रंग देऊ नये. मुंबईत गाड्या चालविण्याची पद्धत बिघडत चालली आहे. प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देऊ नये, असे आवाहन माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

12:16 PM, 7 Jul 2024 (IST)

राजकारणाच्या पलिकडे जाऊन परिस्थिती सुधारावी लागेल- आदित्य ठाकरे

वरळीमधील हिट अँड रन अपघातावर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मत व्यक्त केलं. त्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये मुंबईतल्या वाहनचालकांची ड्रायव्हिंगची पद्धत आणि शिस्त यावर बोट ठेवले. आदित्य ठाकरेंनी म्हटले, " उलट दिशेने गाड्या चालवणं, सिग्नल न पाळणं, ट्रिपल सीट जाणं... सगळंच मुंबईत वाढत चाललंय जे आधी नव्हतं! पण आता तर हिट ॲंड रन सारखे प्रकार घडायला लागलेत! अपघात करणाऱ्या त्या व्यक्तीला जरी तातडीने अटक करण्यात आली असली, तरी अशा घटना होऊच न देणं गरजेचं आहे. त्यासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन ही परिस्थिती आपल्याला सुधारायला लागेल!"

10:23 AM, 7 Jul 2024 (IST)

कसारा आणि टिटवाळामधील रेल्वेस्थानकमधील रेल्वे वाहतूक सेवा ठप्प

कसारा आणि टिटवाळामधील रेल्वेस्थानकमधील रेल्वे वाहतूक सेवा ठप्प झाली. मुसळधार पाऊस आणि झाड कोसळल्यानं रेल्वे वाहतूक स्थगित झाल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

8:55 AM, 7 Jul 2024 (IST)

सुरतमध्ये इमारत कोसळल्यानं ७ जणांचा मृत्यू, एका महिलेला वाचविण्यात यश

सुरतमधील सचिन भागात चार मजली इमारत कोसळल्यानं शनिवारी रात्री मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत ७ जणांचा मृतदेह झाला. गेल्या १२ तासांपासून बचाव कार्य सुरू आहे. एका महिलेला वाचविण्यात यश आले आहे. बचावपथकाकडून ढिगारा हटविण्याचं काम सुरू आहे.

8:51 AM, 7 Jul 2024 (IST)

कुलगाममध्ये सुरक्षा दलाची कारवाई सुरुच, आणखी एका जवानाला वीरमरण

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये कालपासून सुरू असलेल्या कारवाईत चार दहशतवादी ठार झाले आहेत. या चकमकीत सैन्यदलाच्या आणखी एका जवानाला वीरमरण आले. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलाची अजूनही कारवाई सुरू आहे.

8:50 AM, 7 Jul 2024 (IST)

'टायटॅनिक', अवतार सिनेमाचे निर्माते जॉन लँडाऊ यांचे निधन

लॉस एंजेलिस 'टायटॅनिक' आणि 'अवतार' या अत्यंत लोकप्रिय आणि ऑस्कर विजेत्या चित्रपटांचे निर्माते जॉन लँडाऊ यांचे निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. लॉस एंजेलिसमध्ये शुक्रवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांचा मुलगा जेमी लँडाऊ यांनी दुजोरा दिला.

8:33 AM, 7 Jul 2024 (IST)

कुलगाम जिल्ह्यात चार दहशतवादी ठार, सैन्यदलाच्या जवानाला वीरमरण

श्रीनगर- कुलगाम जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. तर सैन्यदलाच्या एका जवानाला वीरमरण आले. या भागात अजूनही चकमक सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Last Updated : Jul 7, 2024, 3:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details