यवतमाळ- यवतमाळ-नागपूर महामार्गवरील चापरडा गावाजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात ईनोवा कारनं ट्रकला मागून धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातात 5 जण ठार झालेत. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. पंजाब येथील शीख कुटुंब नांदेड येथे दर्शनाला जात असताना हा अपघात झाला. अपघात हा इतका भीषण होता की कार ट्रकला धडकताच कारचा सोमोरील पूर्णपणे चक्काचूर झाला.
ट्रक आणि कारच्या अपघातात पाच जण ठार - Breaking News Today
Published : Jul 1, 2024, 7:32 AM IST
|Updated : Jul 1, 2024, 7:38 PM IST
राज्य, देश आणि विदेशातील सर्व महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला या पेजवर पाहता आणि वाचता येतील. सर्वात पहिली आणि खात्रीशीर बातमी तुम्हाला या पेजवर वाचायला मिळेल. त्यासाठी ईटीव्ही भारतच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. 'ईटीव्ही भारत महाराष्ट्र'चे हे लाईव्ह पेज दिवसभर अपडेट होत असते.
विधान परिषदेच्या चार मतदारसंघाचे आज लागणार निकाल, नवी मुंबईतील कोकण भवनमध्ये होणार मतमोजणी
LIVE FEED
ट्रक आणि कारच्या अपघातात पाच जण ठार
नवीन फौजदारी कायद्यानुसार मुंबईत पहिला गुन्हा दाखल, सायबर गुन्ह्याची डीबी मार्गमध्ये नोंद
भारतीय न्याय संहितेचा मुंबईतील पहिला गुन्हा डी बी मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाला. पहिलाच गुन्हा सायबर फसवणुकीचा आहे. भारतीय न्याय संहिता ३१८(४) आणि ३१९(२)* तसेच माहिती तंत्रज्ञानात कायदा ६६(क) ६६ (ड) अंतर्गत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ३६ वर्षीय इसमाची ७३,११६ रुपयांची फसवणूक करण्यात आली. वित्त संस्थेचा अधिकारी असल्याचं भासवून ५ लाखांचे कर्ज देण्याच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली आहे.
कल्याणीनगर अपघातात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या अडचणीत वाढ, जामिनाविरोधात पुणे पोलीस सर्वोच्च न्यायालयात जाणार
पुण्यासह देशभरात गाजलेल्या कल्याणीनगर हायप्रोफाईल अपघातप्रकरणात नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने त्या अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर केला. मात्र, आता पुणे पोलीस या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. तशी परवानगी विधी व न्याय विभागाने पुणे पोलिसांना दिली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांना या निर्णयाविरोधात अपील करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
विधानपरिषद हंगामा, शेलार यांचा संबंध काय?
भारताने १७ वर्षानंतर विश्वकप जिंकला म्हणून सभागृहाने भारतीय टीमचं अभिनंदन करावं, असा प्रस्ताव भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मांडला. पण त्यासोबत विधानसभेचे आमदार आशिष शेलार हे बीसीसीआय कोषाध्यक्ष असल्या कारणानं त्यांचाही अभिनंदनाचा प्रस्ताव त्यांनी मांडला. यावरून सभागृहात गदारोळ झाला. विरोधकांनी प्रस्तावाला हरकत घेतली. आशिष शेलार यांनी राजकीय संन्यास घ्यावा, अशी विरोधकांनी मागणी केली.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणात कोणतेही व्हिजन नाही, केवळ सरकारचं कौतुक- काँग्रेस अध्यक्षांची टीका
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना राज्यसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, राष्ट्रपती हा संसदेचा सर्वात महत्त्वाचा घटक आहेत. आम्ही राष्ट्रपतींचा आदर करतो. यावर्षी राष्ट्रपतींचे पहिले अभिभाषण जानेवारीत आणि दुसरे अभिभाषण जूनमध्ये झाले. त्यांच्या अभिभाषणात मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीयांसाठी काहीही नव्हते. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात कोणतेही व्हिजन आणि दिशा नव्हती. गतवेळेप्रमाणेच या वेळीही राष्ट्रपतींनी सरकारचं कौतुक केलं."
विधिमंडळात पेपरफुटीचा मुद्दा चर्चेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय दिलं उत्तर?
विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर NEET परीक्षेच्या मुद्द्यावरून निदर्शने केली. 'पेपरफुटीचा घोटाळा बेरोजगारीचा घोटतोय गळा, असे फलक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हातात घेतले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शीपणानं परीक्षा घेतल्याचं सांगितलं. "७७ हजार लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. ३३ हजार जणांना नियुक्तीपत्र दिले जाणार आहे. परीक्षा शुल्क कमी करण्याबाबत शक्य असल्यास विचार करण्यात आहे," गृहमंत्र्यांनी सांगितलं. पेपरफुटीचा नॅरेटिव्ह तयार केलं जात आहे, असा आरोप गृहमंत्र्यांनी केला.
जर खोटे आरोप असतील तर त्यांच्यावरदेखील कारवाई झाली पाहिजे-आमदार जयकुमार गोरे
आमदार जयकुमार गोरे यांनी कथित घोटाळ्यावर प्रतिक्रिया दिली. आमदार गोरे म्हणाले, " माझ्यावर कोव्हिड घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत. यावर पोलिसांनी चौकशी केली पाहिजे, ही माझी भूमिका आहे. एकही जिवंत व्यक्तीला मृत दाखवून घोटाळा केला असेल तर चौकशी झाली पाहिजे. मी ३५०० कोविड रुग्णाची सेवा केली आहे. मनोभावे सेवा केल्याचा मला आनंद आहे. राजकारण करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. पण अनेक लोकांचे जीव वाचवले, असा आरोप करणे हे चुकीचे आहे. याबाबत सरकारने कठोर चौकशी झाली पाहिजे. जर खोटे आरोप असतील तर त्यांच्यावरदेखील कारवाई झाली पाहिजे."
विधानसभेचं कामकाज सुरू होताच पेन्शनच्या मुद्द्यावर चर्चा सुरू, केंद्र सरकारनं राज्याकडून मागविली माहिती
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. विधानसभेचं कामकाज सुरू होताच पेन्शनच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे. अर्थमंत्री अजित पवार म्हणाले, " निवृत्त झाल्यानंतर पेन्शन मिळाली पाहिजे. पेन्शनबाबत आम्ही घेतलेल्या निर्णयाची केंद्र सरकारनं माहिती मागविली आहे, "
भारतीय सैन्यदल सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम-सैन्यदलाचे प्रमुख उपेंद्र द्विवेदी
उपेंद्र द्विवेदी यांनी आज सैन्यदलाचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. " सैन्यदलाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा हा क्षण माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि सन्मानाचा आहे. आमच्या सैनिकांना अत्याधुनिक शस्त्रे आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज करणे महत्त्वाचे आहे. मी देशाला आणि देशवासीयांना खात्री देतो की, भारतीय सैन्यदल सध्याच्या आणि भविष्यातील सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे सक्षम आणि तयार आहे."
विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची आज मतमोजणी, विधानपरिषदेची पायरी कोण चढणार?
विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची आज मतमोजणी होणार आहे. नाशिकच्या अंबड वेअर हाऊस येथे 30 टेबलवर मतमोजणी होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत उमेदवार किशोर दराडे,संदीप गुळवे विवेक कोल्हे आणि महेंद्र भावसार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अवघ्या काही तासात विधानपरिषदेची पायरी कोण चढणार हे स्पष्ट होणार आहे.
नीट पेपर फुटीतील लातूरच्या दोन आरोपींना आज सीबीआय घेणार ताब्यात
सीबीआयच्या दोन अधिकाऱ्यांकडून नीट परीक्षा पेपर फुटीतील आरोपींच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सीबीआयचे अधिकारी आरोपी जलील पठाण आणि संजय जाधवला आज ताब्यात घेणार आहेत. लातूर पोलीस दोन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर करणार आहेत.
महायुती सरकारला दोन वर्षे पूर्ण, मुख्यमंत्र्यांनी मानले जनतेचे आभार
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संस्कारामुळेच घडू शकले. हेच विचार आणि संस्कार घेऊन पुढील वाटचाल करायची आहे. विकास साधायचा आहे आणि विश्वास वृद्धिंगत करायचा आहे. गेल्या दोन वर्षांत पाठीशी ठाम उभे राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचे ऋण व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. प्रत्येक घटकाचे अंतःकरणापासून आभार.

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांचे आज निकाल लागणार आहेत. विधान परिषदेच्या दोन पदवीधर तसंच दोन शिक्षक अशा चार मतदार संघासाठी 26 जून रोजी मतदान झाले. नवी मुंबईतील कोकण भवन येथे मुंबई, कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. मुंबई पदवीधरमध्ये उद्धव सेनेचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात, तर कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसच्या रमेश किर यांच्यात सामना आहे. तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ज. मो. अभ्यंकर रिंगणात आहेत.
विजय वडेट्टीवार यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात जाऊन केली तपासणी
नागपूर- विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची रविवारी तब्येत बिघडली. मिळालेल्या माहितीप्रमाणे गेले दोन-तीन दिवस विजय वडेट्टीवार यांना तीव्र अॅसिडिटीचा त्रास झाला. वडेट्टीवार शनिवारी रात्री उशिरा मुंबईतून नागपुरात परतले होते. रविवारी सकाळी माध्यमांशी बोलून विरोधी पक्षनेते नागपुरातून चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीला रवाना झाले होते. त्यांनी तिथे मतदारसंघातील विविध कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली. दुपारनंतर मात्र पुन्हा त्यांची तब्येत बरी वाटत नसल्यामुळे संध्याकाळी ते नागपुरात परतले. त्यांनी थेट न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतःची तपासणी करून घेतली