ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदींनी 'एक पेड माँ के नाम' उपक्रमाचं केलं कौतुक - Breaking News today - BREAKING NEWS TODAY

Maharashtra breaking news
Maharashtra breaking news (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 30, 2024, 7:45 AM IST

Updated : Jun 30, 2024, 1:01 PM IST

'ईटीव्ही भारत महाराष्ट्र'चे हे लाईव्ह पेज दिवसभर अपडेट होत असते. राज्य, देश आणि विदेशातील सर्व महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला या पेजवर पाहता आणि वाचता येतील. सर्वात पहिली आणि खात्रीशीर बातमी तुम्हाला या पेजवर वाचायला मिळेल. त्यासाठी ईटीव्ही भारतच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

ईटीव्ही भारत वेबसाईट लिंक

LIVE FEED

12:56 PM, 30 Jun 2024 (IST)

पंतप्रधान मोदींनी 'एक पेड माँ के नाम' उपक्रमाचं केलं कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'मन की बात' कार्यक्रमाच्या 111 व्या भागात 'एक पेड माँ के नाम' उपक्रमाचं कौतुक केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, "जगातील सर्वात मौल्यवान नाते हे 'आई' आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यात आईचा दर्जा सर्वोच्च आहे. जन्मदात्या आईचे हे प्रेम, आपण सर्वजण कोणीही फेडू शकत नाही, असे कर्ज आहे."

11:12 AM, 30 Jun 2024 (IST)

राहुल द्रविड आणि सर्व खेळाडुंचे अभिनंदन-शरद पवार

भारताने T20 विश्वचषक 2024 जिंकल्याबद्दल शरद पवार यांनी अभिनंदन केले. शरद पवार म्हणाले, " आम्ही आमच्या खेळाडुंच्या कामगिरीवर खूश आहोत. मी राहुल द्रविड आणि सर्व खेळाडूंचे अभिनंदन करतो."

10:54 AM, 30 Jun 2024 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून भारतीय टीमचे केले अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय क्रिकेट संघाच्या खेळांशी फोनवरून संवाद साधत अभिनंदन केले. पंतप्रधान मोदींनी रोहित शर्मासह संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

8:20 AM, 30 Jun 2024 (IST)

भारत टी 20 विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबई विमानतळावर प्रवाशांना मिठाईचे वाटप

T20 विश्वचषक 2024 मध्ये भारताच्या विजयानंतर मुंबई विमानतळावर प्रवाशांना मिठाई वाटण्यात आली. ढोल वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला.

8:04 AM, 30 Jun 2024 (IST)

एक वर्तुळ पूर्ण झाल्याचा आनंद -रोहित शर्मा

"मी 2007 मध्ये खेळायला सुरुवात केली. मी 50 ओव्हर्ससाठी आयर्लंडला गेलो होतो. त्यानंतर आम्ही T20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत गेलो. आज आम्ही जिंकलो. आता हे पूर्ण वर्तुळ झाल्याचा मला खूप आनंद आहे.", अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मानं दिली.

7:54 AM, 30 Jun 2024 (IST)

रोहित शर्मा हा अप्रतिम कर्णधार, भारताच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरकडून कौतुक

टीम इंडियाच्या जर्सीमध्ये जोडलेला प्रत्येक स्टार आपल्या देशाच्या मुलांना त्यांच्या स्वप्नांच्या एक पाऊल पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो. रोहित शर्मा हा अप्रतिम कर्णधार आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातील पराभव विसरून सर्व खेळाडूंना टी-20 विश्वचषकासाठी प्रेरित करणं हे कौतुकास्पद आहे.

7:47 AM, 30 Jun 2024 (IST)

येत्या पाच वर्षात भारतीय संघ अनेक ट्रॉफी जिंकेल-राहुल द्रविड

भारताच्या टी-20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं प्रतिक्रिया दिली आहे. सध्याच्या भारतीय क्रिकेट संघात विलक्षण प्रतिभा आहे. त्यांची ऊर्जा आणि आत्मविश्वास उच्च पातळीवर पोहोचला आहे. भारतीय संघ पुढील 5-6 वर्षात अनेक ट्रॉफी जिंकेल. आम्हाला जशी संघाची बांधणी हवी होती आणि जसे खेळाडू हवे होते, तसं घडविण्याचा हा दोन वर्षांचा प्रवास होता."

7:35 AM, 30 Jun 2024 (IST)

भारताच्या विजयानंतर क्रिकेटप्रेमींचा आनंद मावेना, महाराष्ट्रासह देशभरात जल्लोषाचं वातावरण

नवी दिल्ली- भारतानं १७ वर्षांनंतर दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर देशभरात जल्लोष करण्यात येत आहे. क्रिडा, बॉलीवुड, राजकीय अशा सर्वच क्षेत्रातील दिग्गजांकडून भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक करण्यात येत आहे. शनिवारी रात्री संपूर्ण देशभरात क्रिकेटप्रेमींनी जल्लोष केला. अनेक क्रिकेटप्रेमींनी हातात तिरंगा घेऊन रस्त्यावर गर्दी केली. जम्मू, हैदराबाद, पाटणा, मुंबई, कोल्हापूर, नागपूर या ठिकाणी क्रिकेटप्रेमींनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला.

Last Updated : Jun 30, 2024, 1:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.