ETV Bharat / state

"मला मराठी येत नाही, जा माझी तक्रार करा!" उल्हासनगरात आरपीएफ जवानाची मुजोरी तर आरपीएफचे मराठी अधिकारी म्हणतात "तुम्ही हिंदीत बोला!" - RPF JAWAN ON MARATHI LANGUAGE

'मला मराठी येत नाही, जा माझी तक्रार करा', (Marathi language) अशी मुजोरीची भाषा उल्हासनगरमध्ये आरपीएफ जवानाने वापरली आहे.

RPF jawan on Marathi language
आरपीएफ जवान आणि मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 16, 2025, 8:22 PM IST

ठाणे : "मला मराठी येत नाही, जा माझी तक्रार करा!", (Marathi language) अशी मुजोरीची भाषा उल्हासनगरमध्ये आरपीएफ जवानानं वापरली. मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांच्याशी बोलताना त्यानं ही भाषा वापरली. खळबळजनक बाब म्हणजे "मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला?" असा आरपीएफ अधिकाऱ्यानं संतापजनक सवाल उपस्थित केल्यानं मनसेनं या गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल करुन उल्हासनगरमधील आरपीएफ जवानाची मुजोरी समोर आणली आहे.

"मला मराठी येत नाही, जा माझी तक्रार करा!" : मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर रेल्वे स्थानकात बुकिंगवरुन सुरू असलेल्या गोंधळाची माहिती घेण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम हे आज तिथे गेले होते. त्यावेळी एका आरपीएफ जवानानं हिंदीत बोलण्यास सुरुवात केली. त्यावरुन 'मराठीत बोला' असं सचिन कदम यांनी म्हटलं असता, मला मराठी येत नाही, असं त्यानं म्हटलं. त्यावर याबाबत मी डीआरएमकडं तक्रार करतो, असं सचिन कदम यांनी म्हणताच , "जा माझी तक्रार करा", अशी मुजोरीची भाषा या आरपीएफ जवानानं वापरली. तर त्यानंतर तिथे मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या एका आरपीएफच्या मराठी अधिकाऱ्यानंही 'त्याला मराठी येत नाही, पण तुम्हाला सुद्धा हिंदी येत नाही का? तुम्ही हिंदीत बोला', असा सल्ला मनसे पदाधिकाऱ्यांना दिला.

आरपीएफ जवान आणि मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम (ETV Bharat Reporter)

'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला?' : दरम्यान मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा वापरण्याबाबतचा जीआर काढला असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, असं मनसेच्या सचिन कदम यांनी त्यांना सांगितलं. त्यावर 'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला?' असा संतापजनक सवाल या मराठी आरपीएफ अधिकाऱ्यानं केला. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ समोर आला असून याप्रकरणी आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन महाराष्ट्रात काम करणाऱ्या परप्रांतीय आरपीएफ जवानांना मराठी भाषेचे धडे द्यावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.

हेही वाचा -

  1. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्य शासनाच्या वतीनं विविध पुरस्कार जाहीर, वाचा संपूर्ण यादी
  2. मोठी बातमी : शासकीय कार्यालयात मराठी भाषेचा वापर अनिवार्य, उल्लंघन केल्यास होणार कारवाई
  3. '...परि अमृतातेहि पैजासी जिंके', 'अभिजात' मराठी! - Marathi Language Classical Language

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.