ETV Bharat / bharat

ठाण्यात विद्युत बॉक्सची चोरी करताना विजेचा धक्का लागून मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद - Breaking News in Marathi

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 14, 2024, 9:20 AM IST

Updated : Jul 14, 2024, 1:27 PM IST

Maharashtra Breaking news
Maharashtra Breaking news (Source- ETV Bharat)

'ईटीव्ही भारत महाराष्ट्र'चे हे लाईव्ह पेज दिवसभर अपडेट होत असते. या पेजवर राज्य, देश आणि विदेशातील महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला वाचता येतील. विश्वसनीय आणि ताज्या घडामोंडीसाठी ईटीव्ही भारतच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

ईटीव्ही भारत वेबसाईट लिंक

LIVE FEED

1:26 PM, 14 Jul 2024 (IST)

ठाण्यात विद्युत बॉक्सची चोरी करताना विजेचा धक्का लागून मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद

ठाण्यातील मीरा भाईंदर परिसरात विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. व्यक्ती चोरीच्या उद्देशाने आल्याचं सांगण्यात येत आहे.

12:13 PM, 14 Jul 2024 (IST)

विशाळगड अतिक्रमण मुक्त आंदोलनाला हिंसक वळण, परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण

कोल्हापूर- विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी संभाजी राजे छत्रपती यांनी 'चलो विशाळगड'चा नारा दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर आज संभाजी राजे छत्रपती हे हजारो शिवभक्तांसह विशाळगडकडे रवाना झालेत. संभाजी राजे छत्रपती यांनी विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी आज विशाळगडावर जाण्यापूर्वीच अज्ञात तरुणांच्या गटानं विशाळगडावर दगडफेक केल्याचा प्रकार घडलाय. संभाजी राजे यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं दिसून येत आहे. पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवलं. दरम्यान या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे विशाळगड आणि परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले

11:47 AM, 14 Jul 2024 (IST)

पुणे शहर पोलिसांची मनोरमा खेडकर यांना नोटीस, कारण काय?

पुणे शहर पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना नोटीस बजावली आहे. तुमचे पिस्तुलाचे लायसन्स रद्द का करण्यात येऊ नये, असं या नोटीसच्या माध्यमातून मनोरमा खेडकर यांना विचारण्यात आलंय. गुन्हा नोंद करण्यात आल्यानं पिस्तूलाचे लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आले. पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्या घराबाहेर नोटीस चिकटविली आहे.

11:18 AM, 14 Jul 2024 (IST)

"चंद्राबाबू नायडू-एकनाथ शिंदे यांची भेट काही समीकरण..."-संजय राऊत यांची भेटीवर प्रतिक्रिया

चंद्राबाबू नायडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत. हा एक शिष्टाचाराचा भाग आहे. महाराष्ट्राचं आणि चंद्राबाबू नायडू यांचे काही समीकरण नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली.

10:49 AM, 14 Jul 2024 (IST)

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू एकनाथ शिंदे यांची भेट घेणार

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू हे मुंबईत पोहोचले आहे. चंद्राबाबू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर आले आहेत. चंद्राबाबू हे एनडीए सरकारमध्ये आहेत. एनडीएमधील दोन घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि दोन मुख्यमंत्र्यांमध्ये काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

9:36 AM, 14 Jul 2024 (IST)

संभाजीराजे छत्रपती यांचा चलो विशाळगड'चा नारा, हजारो शिवभक्त विशाळगडाच्या पायथ्याला पोहोचणार

संभाजीराजे छत्रपती यांनी 'चलो विशाळगड'चा नारा दिला. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून हजारो शिवभक्त विशाळगडच्या दिशेनं जाण्यास सज्ज झालेले आहेत. विशाळगडावरील अतिक्रमण हटवावं, अशी मागणी करत आज हजारो शिवभक्त विशाळगडाच्या पायथ्याला पोहोचत आहेत. कोल्हापुरातील भवानी मंडप परिसरातून थोड्याच वेळात संभाजीराजे यांच्या हस्ते भवानी मातेची आरती करण्यात येणार आहे. त्यानंतर विशाळगडच्या दिशेनं हजारो शिवभक्त रवाना होणार आहेत. सध्या भवानी मंडप परिसरात महाराष्ट्राचे शाहीर आझाद नाईकवडी यांचा पोवाडा तसेच पारंपरिक वाद्याचा गजर घुमताना दिसत आहे. असंख्य शिवभक्त हातात भगवे झेंडे घेऊन विशाळगडच्या दिशेने जाण्यास सज्ज झालेले आहेत.

9:31 AM, 14 Jul 2024 (IST)

पूजा खेडकर यांनी वापरलेली ऑडी कार पुणे आरटीओ विभागाकडून जप्त

प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी वापरलेली ऑडी कार पुणे वाहतूक विभागानं जप्त केली आहे. ही कार चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. या कारची पुढील तपासणी आणि कागदपत्र पडताळणीसाठी कार पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे.

8:59 AM, 14 Jul 2024 (IST)

डोनाल्ड ट्रम्प यांनी यूएस सिक्रेट सर्व्हिसचे मानले आभार

वॉशिंग्टन- अमेरिकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे सभेला संबोधित करताना गोळी लागल्यानं जखमी झाले. डोनाल्ड यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या यूएस सीक्रेट सर्व्हिसनं त्यांना तेथून सुखरूप बाहेर काढले. गोळीबाराच्या घटनेला त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सिक्रेट सेवेचे आभार मानले. "ट्रम्प यांनी रॅलीत मारल्या गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला. याशिवाय रॅलीत जखमी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. अमेरिकेत असे कृत्य घडू शकते, यावर विश्वास बसत नाही," असे त्यांनी म्हटले.

Last Updated : Jul 14, 2024, 1:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.