महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

"माझ्या अटकेमागे राजभवनाचा हात, अटकेची स्क्रिप्ट आधीच लिहिली होती", हेमंत सोरेन यांचे गंभीर आरोप

Jharkhand Floor Test : झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावलं आहे. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे ईडीच्या संरक्षणात अधिवेशनात भाग घेण्यासाठी पोहचले.

Jharkhand Floor Test
Jharkhand Floor Test

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 5, 2024, 1:47 PM IST

रांची Jharkhand Floor Test : झारखंडच्या नव्या सरकारला आज विधानसभेत बहुमत सिद्ध करायचं आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना 31 जानेवारी रोजी ईडीनं जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर चंपाई सोरेन यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. चंपाई सोरेन यांनी गेल्या शुक्रवारी राजभवनात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपाच्या घोडे-व्यापाराच्या भीतीनं हैदराबादला गेलेले जेएमएमच्या नेतृत्वाखालील 40 आमदार मतदानात भाग घेण्यासाठी रविवारी संध्याकाळी रांचीला परतले.

देशात प्रथमच मुख्यमंत्र्याला अटक झाली : सभागृहात बोलताना माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले की, मी चंपाई सोरेन यांच्या विश्वास मताच्या समर्थनार्थ उभा राहिलो आहे. आमचा संपूर्ण पक्ष आणि आघाडी त्यांना पाठिंबा देत आहे. 31 तारखेच्या रात्री देशात प्रथमच एका मुख्यमंत्र्याला अटक झाली. देशातील ही पहिलीच घटना आहे. ही घटना घडवण्यात राजभवनचाही कुठेतरी सहभाग आहे, असा मोठा आरोप हेमंत सोरेन यांनी केला.

अटकेची स्क्रिप्ट आधीच लिहिली होती : माझ्या अटकेची स्क्रिप्ट आधीच लिहिली जात असल्याचा आरोप हेमंत सोरेन यांनी केला. अटक सुनियोजित पद्धतीनं करण्यात आल्याचं ते म्हणाले. "मला तुरुंगात पाठवून त्यांची योजना पूर्ण होणार नाही. हे झारखंड आहे. येथील आदिवासी आणि दलित बांधवांनी बलिदान देऊन राज्य वाचवलं आहे", असा घणाघात त्यांनी केला. पुढे बोलताना हेमंत सोरेन म्हणाले की, मी अश्रू ढाळणार नाही, कारण दलित आणि आदिवासींच्या अश्रूंना किंमत नाही. आज मला 8.5 एकर जमीन घोटाळ्यात अटक झाली. हिंमत असेल तर माज्या नावावर कोणती जमीन आहे ते कागदपत्रे सभागृहात दाखवा, असं आव्हान त्यांनी दिलं. एकही कागदपत्र आणून मला दाखवलं तर मी राजकारणातून निवृत्त होईन आणि त्याच दिवशी झारखंड सोडेन, असं हेमंत सोरेन म्हणाले.

हेमंत सोरेन यांच्यावरील आरोप खोटे :झारखंडचे नवे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडताना सांगितलं की, आमचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हेमंत सोरेन यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले. हेमंत यांनी राज्याला कार्यक्षम नेतृत्व दिलं. कोरोना लॉकडाऊन दरम्यान आम्ही झारखंडमधील मजुरांना विमानानं देशभरातून आणलं, असं ते म्हणाले.

हे वाचलंत का :

  1. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन 5 दिवसांच्या ईडी कोठडीत
  2. चंपाई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री, 10 दिवसांत होणार फ्लोर टेस्ट

ABOUT THE AUTHOR

...view details