महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

डॉक्टर तरुणी बलात्कार खून प्रकरण; आज देशभरात डॉक्टर संघटनांचा संप, महाराष्ट्रातील 'इतके' डॉक्टर संपावर - Doctor Rape And Murder Case - DOCTOR RAPE AND MURDER CASE

Doctor Rape And Murder Case : कोलकाता इथल्या डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आल्यानं देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज या प्रकरणी आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या माजी प्राचार्याची चौकशी करण्यात येत आहे. मात्र डॉक्टर तरुणीवर करण्यात आलेल्या अत्याचार प्रकरणी आज देशभारतील डॉक्टर संपावर गेले आहेत.

Doctor Rape And Murder Case
डॉक्टरांचा संप (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 17, 2024, 1:11 PM IST

कोलकाता Doctor Rape And Murder Case :कोलकाता इथल्या आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन खून करण्यात आला. या प्रकरणानं देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज इंडियन मेडिकल असोसिएशन आणि डॉक्टरांच्या संघटनांनी बंदची हाक दिली आहे. त्यामुळे देशभरातील रुग्णालयातील डॉक्टरांकडून आज संप करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील अनेक डॉक्टरांच्या संघटना आज या संपात सहभागी झाल्या आहेत. पुण्यातील 20 हजार डॉक्टरांनी संपात सहभागी होऊन कोलकाता घटनेचा निषेध नोंदवला.

आज देशभरातील डॉक्टर संघटनांचा बंद :कोलकाता इथल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्येप्रकरणी आजपासून डॉक्टर 24 तासांच्या संपावर गेले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशननं (IMA) देशभरातील डॉक्टरांना या काळात सेवा देऊ नये, असं आवाहन केलं आहे. त्यामुळे देशभरातील डॉक्टारांनी या बंदमध्ये सहभाग घेतला आहे. डॉक्टरांनी बंदमध्ये सहभाग घेतल्यानं रुग्णालयातील वैद्यकीय सेवा विस्कळीत झाली आहे. आपत्कालीन सेवा वगळता देशभरातील संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा कोलमडली आहे.

महाराष्ट्रातील डॉक्टरही झाले संपात सहभागी :इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) च्या वतीनं कोलकाता इथल्या आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात डॉक्टर तरुणीवर बलात्कार तिचा खून करण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या डॉक्टर संघटनांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. आज सकाळी 6 वाजतापासून 24 तासांसाठी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याची घोषणा आयएमएनं केली आहे. महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या संघटनांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवला आहे. पुण्यातील तब्बल 20 हजार डॉक्टरांनी या संपात सहभाग नोंदवला. त्यासह मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर आदी ठिकाणचे डॉक्टर या संपात सहभागी झाले आहेत.

हेही वाचा :

  1. डॉक्टर बलात्कार खून प्रकरण ; पीडितेच्या पालकांचा इंटर्न डॉक्टरांवर गंभीर आरोप, संशयितांची नावं दिल्यानं खळबळ - Kolkata Doctor Murder Case
  2. डॉक्टर तरुणी खून बलात्कार प्रकरण : रुग्णालयात तोडफोड करणाऱ्या 19 जणांना अटक, डॉक्टर संघटनांचा संप सुरूच - Doctor Rape Murder Case
  3. डॉक्टर तरुणी खून प्रकरण : मार्ड डॉक्टरांचा संप, तर पुण्यातील 'ससून'मधील निवासी डॉक्टर संपावर - Kolkata Doctor Rape Murder Case

ABOUT THE AUTHOR

...view details