नवी दिल्ली -उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्या घेऊन सोमवारी दिल्लीवर मोर्चा काढलाय. त्यामुळे दिल्लीतील सीमेवर सुरक्षा दलांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या शेतकऱ्यांच्या मोर्चामुळे डीएनडी उड्डाण मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालीय. विशेष म्हणजे चिल्ला सीमेवरही वाहतूक विस्कळीत झालीय. शेतकरी दिल्लीकडे मोर्चा काढणार असल्याचं समजल्यानंतर सोमवारी सकाळी रहदारीच्या मार्गात बदल करण्यात आलाय आणि पोलिसांच्या तपासणीमुळे सीमेवरील वाहतुकीवर परिणाम झालाय. सेक्टर १५ ए ते दिल्ली, तसेच कालिंदी कुंज ते दिल्ली मार्गे चिल्ला बॉर्डरवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सकाळपासून नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले होते.
वाहतूक पुन्हा सामान्य गतीने सुरू:शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी संपूर्ण रस्ता अडवून त्यांना महामाया येथे रोखले. दिल्लीच्या दिशेने कूच करण्यासाठी महामाया उड्डाणपुलाखाली शेतकरी जमू लागले आहेत. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना तिथेच रोखले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करून पायी जाण्यास सुरुवात केलीय. एक मार्ग रिकामी राहिल्याने वाहतूक कोंडी होतेय. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी वाढतेय. त्याचवेळी सुरक्षा कर्मचारी त्यांना पुढे जाण्यापासून रोखत आहेत. वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, दिल्ली अन् सीमा भागात शेतकरी दिल्लीला आल्यानंतर त्यांची तपासणी केली जातेय, त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती. सध्या सर्व लाल दिव्याचे सिग्नल पुन्हा हिरवे करण्यात आलेत. वाहतूक पुन्हा सामान्य गतीने सुरू आहे. आयुक्तालय गौतम बुद्ध नगर पोलीस वाहतूक सुरळीतपणे सांभाळत आहेत.
5 हजार पोलीस तैनात- मीना :पोलीस सहाय्यक आयुक्त शिवहरी मीना म्हणाले, "दिल्लीकडे मोर्चा काढलेल्या शेतकऱ्यांशी आमची सातत्याने चर्चा सुरू आहे. कालही आम्ही 3 तास चर्चा केली. आम्ही त्रिस्तरीय सुरक्षा योजनाही तयार केलीय. त्याअंतर्गत सुमारे 5 हजार कर्मचारी वाहतूक व्यवस्थापनही जवळपास 1000 कर्मचारी सांभाळत आहेत.