महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आदिवासी तरुणाला नग्न करुन बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल, तीन महिन्यानंतर प्रकरण उघडकीस - व्हायरल व्हिडिओ

man stripped naked: बैतुल येथील आदिवासी तरुणावर झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हल्लेखोरांनी तरुणाला उलटे लटकवून बेल्ट आणि काठीनं बेदम मारहाण केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन कारवाई सुरू केली आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 14, 2024, 1:23 PM IST

व्हिडिओ

बैतूलman stripped naked : मध्य प्रदेशातील आदिवासींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. बैतुल येथून ताजं प्रकरण समोर आलं आहे. इथं एका आदिवासी तरुणाला नग्न करुन उलटं टांगून बेल्ट आणि काठीनं मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्यांनी या घटनेचा व्हिडिओही बनवला आहे. सध्या मोठ्या प्रमाणात या घटनेचा व्हायरल व्हिडिओ समाजमाध्यमावर फिरत आहे. या घटनेला तीन महिने झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर या तरुणानं याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. आता पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

व्हिडिओ 3 महिन्यांपूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे : (15 नोव्हेंबर 2023 ) ला रिंकेश चौहान नावाचा तरुण, पीडिताला बैतुलमध्ये घेऊन आला होता. तो त्याला बैतूल येथील एका घरात घेऊन गेला. त्यावेळी घरात 6- लोक उपस्थित होते. त्यांनी त्याचे सर्व कपडे काढून त्याला छताला उलटं टांगलं. त्यानंतर त्याला बेल्ट आणि काठ्यांनी मारहाण करुन सोडून दिलं. तो कसा तरी फरार झाला. त्यानं मारहाणीची तक्रार केली नाही. कारण त्याला मारहाण करणाऱ्या लोकांची भीती होती. मात्र, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर त्यानं पोलिसात तक्रार दिली.

आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे : बेतुलचे पोलीस अधिकारी सिद्धार्थ चौधरी म्हणाले, 'एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये, एका तरुणाला विवस्त्र करुन उलटं टांगून मारहाण करण्यात आली.' पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडिओ सुमारे तीन महिन्यांपूर्वीचा आहे. सध्या आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आता एवढ्या उशिरा कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यातून दोषींच्यावर कारवाई होईल की नाही याची उत्सुकता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details