महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लग्नाला वय नसते : माजी आयपीएस अधिकारी 81 व्या वर्षी पुन्हा चढले बोहल्यावर, आंगणवाडी सेविकेसोबत बांधली लगीनगाठ - Former IPS Marriage At 81 Year - FORMER IPS MARRIAGE AT 81 YEAR

Former IPS Marriage At 81 Year : माजी आयपीएस अधिकारी एस आर दारापुरी यांनी वयाच्या 81 वर्षी आंगणवाडी सेविकेसोबत लगीनगाठ बांधली आहे. एस आर दारापुरी यांना लखनऊ हिंसाचारात जमावाला चिथवल्यानं अटक करण्यात आली होती. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे.

Former IPS Marriage At 81 Year
एस आर दारापुरी आणि त्यांची नववधू (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 10, 2024, 10:12 AM IST

Updated : Aug 10, 2024, 10:23 AM IST

लखनऊ Former IPS Marriage At 81 Year : आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जोडीदाराची साथ मिळणं गरजेचं आहे. त्यातही संसाराचा रथ एका चाकावर चालत नाही, त्यासाठी दोन्ही चाकं असणं महत्वाचं आहे. जीवनाचा प्रवास एकट्यानं होत नाही, त्याचा प्रत्यय नुकताच लखनऊच्या नागरिकांनी अनुभवला आहे. त्याचं झालं असं की लखनऊचे माजी आयपीएस अधिकारी एस आर दारापुरी हे वयाच्या 81 व्या वर्षी पुन्हा बोहल्यावर चढले आहेत. एस आर दारापुरी यांनी लग्न केल्यानंतर लग्नाचे फोटो सोशल माध्यमांवर पोस्ट केले आहेत. माजी आयपीएस अधिकारी यांनी गुरुवारी 8 ऑगस्टला दुसरं लग्न केलं आहे. विशेष म्हणजे एस आर दारापुरी यांना वाहिद दारापुरी आणि राहुल दारापुरी अशी दोन मुलं तर सुलचना दारापुरी ही मुलगी आहे. सुलोचना यांचं लग्न झालं असून एस आर दारापुरी यांच्या पत्नीचं 2022 मध्ये निधन झालं आहे.

एस आर दारापुरी आणि त्यांची नववधू (ETV Bharat)

माजी आयपीएस अधिकारी 81 व्या वर्षी चढले बोहल्यावर :व्यक्तीचं लग्न कोणत्याही वयात केलं जाऊ शकते, याची प्रचिती माजी आयपीएस अधिकारी एस आर दारापुरी यांच्या कृतीतून दिसून आलं. एस आर दारापुरी यांनी वयाच्या 81 व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढले आहेत. एस आर दारापुरी हे लखनऊच्या इंदिरानंगर परिसरात राहतात. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी असून मुलीचं लग्न झालं आहे. माजी आयपीएस अधिकारी एस आर दारापुरी यांनी गुरुवार 8 ऑगस्ट रोजी दुसरं लग्न केलं. लखीमपूर येथील एका तरुणीशी त्यांनी लग्न केलं आहे. पहिल्या पत्नीचं 2022 मध्ये निधन झाल्यानंतर ते पूर्णपणे एकटे पडले होते. त्यांची मुलं वडिलांसाठी सर्व काही करतात, मात्र त्यांचा एकटेपणा दूर करू शकत नाहीत. त्यामुळे एस आर दारापुरी यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला.

आंगणवाडी सेविकेसोबत बांधली लगीनगाठ :माजी आयपीएस अधिकारी एस आर दारापुरी हे वयाच्या 81 व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढले आहेत. त्यांनी आंगणवाडी सेविकेसोबत लगीनगाठ बांधली आहे. याबाबत बोलताना त्यांच्या मित्रांनी सांगितलं की, "एस आर दारापुरी हे नेहमी समाजाचा विचार करतात. लोकांच्या हिताचा विचार केल्यामुळेच ते लोकप्रिय आहेत. त्यांची प्रकृती आता खराब असते. त्यांनी आता दुसरं लग्न केलं असून ते सामान्य स्त्री सोबत केलं आहे."

जमाला चिथावणी दिल्यानं एस आर दारापुरींना केलं होतं अटक :नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात लखनऊमध्ये हिंसक निदर्शनं करण्यात आली होती. यावेळी जमावाला चिथावणी दिल्याप्रकरणी एस आर दारापुरी यांना अटक करण्यात आली. आयपीएस अधिकाऱ्याला अटक केल्यानं ते बरेच चर्चेत होते. त्यानंतर प्रियांका गांधी यांनी दारापुरी कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेल्या. एस आर दारापुरी हे 1972 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ते मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. एस आर दारापुरी यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली आहे. भारतीय पोलीस सेवेत त्यांनी 40 वर्षे विविध पदांवर काम केलं. विशेष म्हणजे ते आंबेडकरी महासभेसह अनेक संघटनेचे पदाधिकारी आहेत.

हेही वाचा :

  1. लेकानं पुरवला अनोखा हट्ट; 80 वर्षीय बापाचं दिलं थेट लग्नच लावून, वरातीत बाप-लेक-नातवंड 'झिंगाट' - Marriage Ceremony Amravati
  2. महाराष्ट्राती 'या' गावात होतात प्रेमविवाह, महिला सरपंचासह 11 ग्रामपंचायत सदस्यामध्ये फुलले प्रेमाचे गुलाब
Last Updated : Aug 10, 2024, 10:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details