जयपूर :तब्बल 150 फूट बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुकल्याला मागील 55 तासांपासून बचावण्यासाठी कार्य सुरू होतं. मात्र अखेर या चिमुकल्याला बाहेर काढलं असलं, तरी त्याला बचावण्यात बचाव पथकाला अपयश आलं आहे. तब्बल 55 तासांच्या अथक मोहिमेनंतरही त्याला बाहेर काढल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं. हा चिमुकला राजस्थानमधील दौसा इथल्या कालीखड गावात सोमवारी खेळताना बोअरवेलमध्ये पडला होता. त्यानंतर त्याला बचावण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम राबवण्यात आली.
150 फूट बोअरवेलमध्ये पडला चिमुकला :राजस्थानमधील दौसा इथं सोमवारपासून 150 फूट बोअरवेलमध्ये पडलेल्या 5 वर्षीय चिमकल्याला बुधवारी रात्री 55 तासांच्या बचाव मोहिमेनंतर बाहेर काढलं. मात्र या चिमुकल्याला बाहेर काढल्यानंतर त्याला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलं. हा चिमुकला 9 डिसेंबरला खेळत असताना बोअरवेलमध्ये पडला. चिमुकला बोअरवेलमध्ये पडल्यानंतर मोठी खळबळ उडाली. त्याला बचावण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली. सोमवारी दुपारी 3 वाजता कालीखड गावात ही घटना घडल्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आलं.