विश्वविजेत्या भारतीयं संघाला केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाल्या... - Raksha Khadse - RAKSHA KHADSE
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jun 30, 2024, 5:04 PM IST
जळगाव Raksha Khadse : भारतीय क्रिकेट संघानं शनिवारी टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत 17 वर्षानंतर टी20 विश्वचषकावर नाव कोरलंय. यानंतर भारतीय संघांवर संपूर्ण देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह माजी खेळाडू, बॉलीवूडचे अभिनेता यांनीही भारतीय संघाचं कौतुक केलंय. तसंच केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनीही भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. "मला टीम इंडियाचा सार्थ अभिमान आहे. भारतीय टीमनं टी20 विश्वचषक जिंकला असून भारतीयांच्या दृष्टीनं ही अभिमानाची बाब आहे. 17 वर्षानंतर भारतानं हा विश्वचषक जिंकला आहे. भारतीय संघ हा प्रत्येक विभागामध्ये चांगला खेळ करत असून, भारतीय सरकार हे प्रत्येक खेळाडूंच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. मी भारतीय टीमला शुभेच्छा देते की त्यांनी आगामी काळात अशीच चांगली कामगिरी करावी."