भारतीय क्रिकेट संघाचं मुंबई विमानतळावर चाहत्यांकडून जंगी स्वागत - Team India victory parade in Mumbai - TEAM INDIA VICTORY PARADE IN MUMBAI
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 4, 2024, 7:29 PM IST
मुंबई Victory Parade Celebration : भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. यावेळी क्रिकेट चाहत्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. त्यानंतर भारतीय संघ वानखेडे स्टेडियमकडे रवाना झाला. यावेळी टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईत रस्त्याच्या दुतर्फा चाहत्यांची गर्दी दिसून येत आहे. तर दुसरीकडं वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघासाठी मरिन ड्राईव्हवर क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. येथून संघाची विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. यासाठी मुंबईतील जगप्रसिद्ध डबेवालेही सहभागी झाले असून मुंबईचा किंग रोहित शर्माचे हातात बॅनर घेऊन ते जोरदार घोषणा देत आहे. भारतीय संघाचा ताफा मुंबई विमानतळावरून वांद्रे, वरळी सागरी सेतूवरून जाणार असून लवकरच मरीन ड्राईव्हवर पोहोचेल. टीम इंडियाची विजयी मिरवणूक थोड्याच वेळात सुरू होईल. हा सोहळा पाहण्यासाठी चाहते मरिन ड्राईव्हवर जमले आहेत. दुसरीकडे गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई पोलिसांनी नागरिकांना मरीन ड्राईव्ह येथे न येण्याचं आवाहन केलं आहे. मुंबईकरांचा मोठा जनसमुदाय भारतीय संघाचे स्वागत करण्यासाठी वानखेडे स्टेडियम आणि मरीन ड्राईव्ह येथे जमलेला पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना फोन करून पोलीस प्रशासनाने सर्व उपाययोजना कराव्या असे आदेश दिले आहेत.