क्वालालंपूर ICC U19 Womens World Cup : सध्या मलेशियात महिलांचा 19 वर्षांखालील T20 क्रिकेट विश्वचषक सुरु आहे. ज्यात भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यात उपांत्य फेरीचा सामना खेळवण्यात आला. भारतीय महिला संघानं हा सामना 9 विकेट्सनं जिंकला आहे. भारताच्या विजयासह, इंग्लंडचा स्पर्धेतील प्रवास इथं संपला आणि टीम इंडियानं अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. महिला 19 वर्षांखालील T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. यासह भारतीय महिला संघानं सलग दुसऱ्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
India make it to their second successive #U19WorldCup final with a sensational win over England 👊#INDvENG 📝: https://t.co/6nETIjgDAE pic.twitter.com/NJr0UyxlW1
— ICC (@ICC) January 31, 2025
कसा राहिला सामना : या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात इंग्लंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर, त्यांचा संघ फलंदाजीसाठी मैदानात आला आणि 20 षटकांत 8 गडी गमावल्यानंतर त्यांना फक्त 113 धावा करता आल्या. यावेळी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. भारताकडून वैष्णवी शर्मा आणि पारुनिका सिसोदिया यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर आयुषी शुक्लानं दोन विकेट मिळवल्या. इंग्लंडकडून फक्त डेव्हिना पेरिन आणि अबी नॉरग्रोव्ह यांनीच फलंदाजीत चांगली खेळी केली. डेव्हिना पेरिननं 45 आणि अबी नॉरग्रोव्हनं 30 धावा केल्या.
Reigning champions India book their spot in the #U19WorldCup 2025 Final to defend their crown 👑 pic.twitter.com/GqoZS1frZX
— ICC (@ICC) January 31, 2025
टीम इंडियानं सहज गाठलं लक्ष्य : या सामन्यात भारतीय संघानं फक्त एक विकेट गमावून केवळ 15 षटकांत 117 धावा करुन 114 धावांचं लक्ष्य गाठलं. टीम इंडियासाठी हा सामना जिंकणं खूप सोपं होतं. भारतीय सलामीवीरांनी एकहाती खेळ करत सामना त्यांच्या बाजूनं वळवला. जी कमलिनी आणि गोंगाडी त्रिशा यांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली आणि टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन दिली. या सामन्यात कमलिनीनं 56 धावांची खेळी खेळली. तर गोंगाडीनं 35 धावा केल्या. टीम इंडियाचा अंतिम सामना 02 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवला जाईल.
📸 📸
— BCCI Women (@BCCIWomen) January 31, 2025
𝗜𝗻 𝗣𝗶𝗰𝘀: Summing up #TeamIndia's dominating performance in the #U19WorldCup Semi-Final 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/rk4eoCA1B0 #INDvENG pic.twitter.com/ZOLzTy6tWF
हेही वाचा :