"26 राज्यांपैकी 24 राज्यांचे अध्यक्ष...", शरदचंद्र पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा - Siraj Mehndi - SIRAJ MEHNDI
🎬 Watch Now: Feature Video
Published : Apr 27, 2024, 10:39 PM IST
पुणे Siraj Mehndi News : राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर अनेक राज्यासह देशभरातील नेते तसंच पदाधिकारी हे अजित पवारांबरोबर असल्याचं सांगितल जातंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अल्पसंख्याक अध्यक्ष सिराज मेहंदी यांना यासंदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "अजित पवारांना माहीत आहे की आम्ही शरद पवार यांचे कार्यकर्ता म्हणून नेहमी त्यांच्या सोबत आहोत, आणि त्यामुळंच अजित पवारांनी आम्हाला फोन केला नाही. आज देशातील 26 राज्यांपैकी 24 राज्यांचे अध्यक्ष हे शरद पवारांसोबत आहेत. तसंच जे पक्ष सोडून गेले ते ईडी, सीबीआय यांना घाबरून गेले, असा आरोपही सिराज मेहंदी यांनी केला. दरम्यान, सिराज मेहंदी हे आज (27 एप्रिल) पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी जिल्ह्यातील महाविकास आघाडीविषयी त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, उद्या बारामतीत आमचा दौरा असून तिथं जाऊन आम्ही अल्पसंख्याक समाजात प्रचार करणार आहोत. तसंच जिल्ह्यातील चार जागांपैकी 3 जागा आम्ही जिंकणार असल्याचा, विश्वासही त्यांनी व्यक्त केला.