ETV Bharat / state

सैफ हल्ला प्रकरणाबाबत मुंबई पोलिसांनी उलगडले 'हे' तीन मुद्दे; फिंगर प्रिंटबाबत दिलं स्पष्टीकरण - SAIF ALI KHAN ATTACK CASE

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणाबाबत माहिती देण्यासाठी मुंबई पोलिसांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्दे स्पष्ट केले.

mumbai police on saif attack case
सैफ हल्ला प्रकरणाबाबत माहिती देताना मुंबई पोलीस (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2025, 7:18 PM IST

Updated : Jan 28, 2025, 7:55 PM IST

मुंबई : अभिनेता सैफ अली खानच्या घरातील चोरी व हल्ल्याप्रकरणातील आरोपीच्या फिंगर प्रिंटबाबत कोणताही अधिकृत अहवाल अद्याप आलेला नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजित सिंह दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षित गेडाम यांची पत्रकार परिषद मंगळवारी झाली. त्यामध्ये दहिया यांनी ही माहिती दिली. सैफच्या घरातून 19 फिंगर प्रिंट घेण्यात आल्या होत्या. त्याचा अहवाल येणं बाकी असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.

मुंबई पोलिसांची पत्रकार परिषद (ETV Bharat Reporter)
  1. फिंगर प्रिंट अहवाल अजून आला नाही : वांद्रे पोलीस स्थानकातील गुन्हा क्रमांक 85/2025 तील आरोपीविरोधात भक्कम पुरावा मिळालाय. डीसीपी झोन 9 व गुन्हे शाखेने चांगल्या पद्धतीनं तपास केला. याबाबत पुढील तपास सुरु आहे. या प्रकरणातील फिंगर प्रिंटबाबत अद्याप कोणताही अधिकृत अहवाल आलेला नाही. त्यामुळं याबाबतचा संभ्रम दूर करण्याची गरज आहे, असं अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणाले. या प्रकरणी फिंगर प्रिंट सीआयडीकडे पाठवले आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
  2. अटक आरोपीविरोधात सबळ पुरावे : "या प्रकरणी जो आरोपी पकडलेला आहे, त्याविरोधात न्यायालयात टिकणारे सबळ पुरावे मिळाले आहेत. ओरल, फिजिकल व तांत्रिक पुरावे मिळाले आहेत. या प्रकरणी आरोपीची ओळख परेड अद्याप झालेली नाही, त्याची लवकरच ओळख परेड होईल," असंही त्यांनी स्पष्ट केलं. "या प्रकरणी अद्याप एकालाच अटक करण्यात आली असून, या व्यतिरिक्त दुसरा आरोपी आढळून आलेला नाही. मात्र, आरोपी ज्यांच्या संपर्कात आला होता, त्यांची चौकशी केली जात आहे," अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी दिली.
  3. आरोपी बांगलादेशी असल्याचे ठोस पुरावे : "अटक करण्यात आलेला आरोपी बांगलादेशी असल्याचे ठोस पुरावे सापडले आहेत. फेस आयडेंटिफिकेशन रिकग्नेशन हा पर्याय आमच्या समोर आहे. तपासी अधिकाऱ्याची झालेली बदली ही तांत्रिक बाब आहे. रात्रीची घटना असल्यानं रात्रपाळीचे अधिकारी सुरुवातीला चौकशी करत होते. प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्यांची साक्ष नोंदवली आहे, अप्रत्यक्ष साक्षीदारांची साक्ष नोंदवली जाईल . या घटनेची रुग्णालयातून आम्हाला माहिती मिळाली," असं ते म्हणाले. "आरोपी बांगलादेशमधून आल्यानंतर कोलकाता येथे वास्तव्याला होता. त्या सर्व पैलूंचा तपास सुरु आहे," अशी माहिती दहिया यांनी दिली.

हेही वाचा -

  1. सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणात बंगाली तरुणीची चौकशी, काय माहिती आली समोर?
  2. सैफ अली खान प्रकरण; ताब्यात घेतलेला तरुण वेडा झाल्याचा वडिलांचा दावा, मुलाला नोकरी देण्याची मागणी
  3. सैफ अली खानवर हल्ला झाला त्या रात्री काय घडले? मुंबई पोलिसांनी अभिनेत्याचा जबाब नोंदवला...

Last Updated : Jan 28, 2025, 7:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.