ठाणे- डोंबिवली पूर्वेतील नांदिवली भागात एका गृहसंकुलात सोसायटीत सत्यनारायणाची पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रम करण्यावरून मराठी अन् अमराठी भाषकांमध्ये पुन्हा एकदा जोरदार राडा झाल्याची घटना समोर आलीय. ही घटना डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पंचानंद सोसायटीत घडलीय. विशेष म्हणजे मराठी महिला आपला धार्मिक कार्यक्रम करण्यावर ठाम होते, तर अमराठी परप्रातीय हिंदी भाषक हा कार्यक्रम होऊ देणार नसल्याचं सांगत आक्रमक झाले होते. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी परप्रातीय हिंदी भाषकांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी दिलीय.
अमराठी भाषकांचा कार्यक्रम करण्यास विरोध : मराठी भाषक महिलेने माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले की, आमच्या सोसायटीत सत्यनारायण पूजा किंवा हळदीकुंकू कार्यक्रम करण्यासाठी आम्ही सोसायटी सदस्यांकडून किंवा सोसायटी चालकांकडून वर्गणी मागितली नव्हती. आम्ही स्वखर्चाने हा कार्यक्रम करीत आहोत. या कार्यक्रमाची माहिती सोसायटीच्या फलकावर प्रसिद्ध करण्यात आली. या कार्यक्रमाची चर्चा सोसायटीच्या व्हाॅट्सअॅप ग्रुपवर सुरू करण्यात आली. ही चर्चा सुरू असताना अमराठी भाषकांनी हा कार्यक्रम सोसायटीत होऊ द्यायचा नाही, अशी भूमिका घेतली. मात्र तेव्हा अमराठी व्यक्तीने आम्हाला शिवीगाळ करत हा कार्यक्रम करण्यास विरोध केलाय.
धूप, अगरबत्ती लावण्यावरून मराठी अन् परप्रांतीयांमध्ये वाद : अमराठी भाषक आमच्या कार्यक्रमाला विरोध करतात म्हणून आम्ही मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलो, असेही त्यांनी सांगितले. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये कल्याणमध्ये धूप अगरबत्ती लावण्यावरून मराठी आणि परप्रांतीयांमध्ये वाद उफाळून आला होता. या प्रकरणात सरकारी अधिकारी असलेला एक परप्रांतीय अधिकारी अडचणीत आला. शासनाने त्यांना सेवेतून निलंबित केलंय. रेल्वे स्थानक भागात भाजीपाला, फळ विक्री व्यवसाय करणारे परप्रांतीय विक्रेते, फेरीवाले मुजोर झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
अमराठी व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल : या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी सांगितले की, सोसायटीत रहिवाशांनी एकोप्याने राहावे, असे अपेक्षित असते. नांदिवलीतील गृहसंकुलात मराठी नागरिकांच्या एका धार्मिक कार्यक्रमात अमराठी नागरिक अडथळे आणत होते. हा विषय पोलीस ठाण्यात आला. जातीय तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याने अमराठी व्यक्ती विरुद्ध एका मराठी भाषक महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय.
हेही वाचा-
सोसायटीत सत्यनारायणाची पूजा अन् हळदी कुंकू कार्यक्रमावरून मराठी-अमराठी भाषकांमध्ये जोरदार राडा - SATYANARAYANA PUJA
मानपाडा पोलिसांनी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी परप्रांतीय हिंदी भाषकांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबानेंनी दिलीय.
Published : Jan 28, 2025, 6:54 PM IST