ETV Bharat / state

हेल्पलाईनच्या मदतीनं दहा महिन्यात 70 बालविवाह थांबवण्यात यश, जागृती गरजेची अभ्यासकांचे मत - CHILD MARRIAGE

छत्रपती संभाजीनगरमध्ये चाईल्ड हेल्प लाईनच्या माध्यमातून ७० बालविवाह थांबवण्यात आले आहेत. परंतु, अजुनही अनेक बालविवाह होतात, ज्यांची माहिती यंत्रणेला समजत नाही.

Etv Bharat
बालविवाह (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2025, 6:47 PM IST

Updated : Jan 28, 2025, 7:55 PM IST

छत्रपती संभाजीनगर : आजच्या शिक्षित युगात देखील बालविवाह होण्याचं प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात चाईल्ड हेल्प लाईनच्या माध्यमातून मागील दहा महिन्यात 70 बालविवाह थांबवण्यात यश आलं आहे. मात्र आजही अनेक विवाह असे आहेत, ज्यांची माहिती यंत्रणे पर्यंत पोहोचत नाही. त्यामुळं अजूनही या विषयावर काम करण्याची गरज असल्याचं मत सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिवंसरा यांनी व्यक्त केलं. तर थांबवण्यात आलेल्या विवाह संबंधित मुलींच्या कुटुंबीयांशी चर्चा करुन पुढील शिक्षणाबाबत जागृती करणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

हेल्पलाईनवर आल्या तक्रारी : चाईल्ड हेल्प लाईन क्रमानं 1098 हा क्रमांक मदतीसाठी सुरू करण्यात आला. त्यावर अनेक तक्रारी येत असतात. त्यावर बाल कल्याण समिती आणि पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात येते. मागील दहा महिन्यात या क्रमांकाच्या मदतीने जिल्ह्यात तब्बल 70 बालविवाह थांबवण्यात यश आल्याची आकडेवारी समोर आली आहे. म्हणजे महिन्याला साधारणतः सात बलविवाह होत असल्याचं निदर्शनास येत आहे.

माध्यमांशी बोलताना मंगल खिवंसरा (ETV Bharat Reporter)

छ. संभाजीनगर जिल्ह्यातील तालुका निहाय माहिती :

छ. संभाजीनगर - 25

पैठण - 14

गंगापूर - 6

वैजापूर - 5

कन्नड - 2

फुलंब्री - 9

सिल्लोड - 4

सोयगाव - 5

खुलताबाद - 0

अशी मिळते माहिती : चाईल्ड हेल्पलाईन 1098 हा क्रमांक सरकारनं समाजात लहान मुलांच्या मदतीसाठी सुरू केला. या क्रमांकावर एखादी व्यक्ती 18 वर्षाखालील मुलींच्या होणाऱ्या विवाहाबाबत माहिती देऊ शकते. शिवाय कुमारी माता किंवा बालकांची माहिती, हरवलेल्या मुलांच्या संदर्भात माहिती, व्यसन करणारी अल्पवयीन मुलं, बेवारस किंवा गरीब मुलांना वैद्यकीय मदत हवी असल्यास, बालकांच्या शोषणाबाबत माहिती देण्यासाठी हा क्रमांक उपयुक्त ठरतो. या क्रमांकावर काही वेळा अज्ञात व्यक्ती आपली ओळख न देता देखील माहिती देऊन होणाऱ्या चुकीच्या घटना थांबवण्याचा प्रयत्न करतात. त्याच माध्यमातून दहा महिन्यात 70 बालविवाह थांबवण्यात यश आल्याची माहिती चाईल्ड लाईन समुपदेशक आम्रपाली बोरडे यांनी दिली.

यावर काम गरण्याची गरज : बालविवाह ही आधुनिक काळातही समस्या असल्याचं समोर येत आहे. त्यामुळं समाज कितीही शिक्षित झाला तरी, आजही या विषयावर काम करण्याची गरज असल्याचं मत सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिवंसरा यांनी व्यक्त केलं. आजच्या घडीला समोर आलेली आकडेवारी धक्कादायक आहे. मात्र असे अनेक विवाह आहेत, ज्यांची माहिती समोर येत नाही. त्यामुळं समाजात अद्याप जागृती करण्याची गरज आहे असं दिसून येत आहे. शिवाय ज्यांचे विवाह थांबवण्यात यश आलं अशा मुलींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या पुढील शिक्षणाबाबत विचार करण्याचं काम करणं आवश्यक असल्याचं मंगल खिवंसरा यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. लग्नपूर्व समुपदेशन काळाची गरज; प्रत्येक जिल्ह्यात समुपदेशन कक्षासाठी प्रयत्न करणार - रुपाली चाकणकर - Premarital counseling
  2. अल्पवयीन आदिवासी विवाहितेचा गरोदरपणात मृत्यू; पतीला अटक, दहा जणांविरुद्ध गुन्हा - Palghar Crime News
  3. पुन्हा उधळला दोन बालविवाहाचा घाट; चाईल्ड हेल्पलाईन, जिल्हा बालसंरक्षण कक्षाची कारवाई - Child Marriage In Chandrapur

Last Updated : Jan 28, 2025, 7:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.