ETV Bharat / state

नागपुरात ऑनलाईन गेम खेळणे उठले जिवावर, १७ वर्षीय मुलीची गेम खेळतानाच आत्महत्या - GIRL COMMITS SUICIDE

नागपुरात एका अल्पवयीन मुलीला ऑनलाईन गेम खेळणे जिवावर उठले आहे. १७ वर्षीय मुलीनं गेम खेळतानाच आत्महत्या केलीय.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2025, 6:35 PM IST

नागपूर - नागपुरात ऑनलाईन गेम खेळताना एका १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडलेली आहे. आईला पहाटेच्या सुमारास ही मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसल्यानंतर त्या मुलीला रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्या मुलीला मृत घोषित केलं आहे. ही खळबळजनक घटना धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी या बाबत फारसे बोलण्यास नकार दिला आहे.

गेम उठला जिवावर : स्विटी (बदललेले नाव) ही मुलगी बारावीची विद्यार्थिनी होती. तिचे वडील शासकीय बँकेत विभागीय व्यवस्थापक आहेत. स्विटी ही आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. ती नेहमी ऑनलाईन गेम खेळत असे. ती ‘डेथ’ हा शब्द नेहमी गुगलवर सर्च करीत होती. तिचे ऑनलाईन गेम खेळणे इतके वाढले की ती नेहमी त्यातच गुंतलेली असायची. ती सध्या मृत्यूशी संबंधित अशीच एक गेम ऑनलाईन खेळत होती. या गेमच्या शेवटच्या ‘टास्क’मध्ये ती कदाचित असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. यातूनच स्वतःचे बरे वाईट करुन घेण्याचा टास्क या गेममध्ये असण्याची शक्यता आहे. त्यातूनच तिने ही आत्महत्या केलेली असावी अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

संपूर्ण कुटुंबीय झोपी गेल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास स्विटी हा गेम खेळण्यात मग्न होती. त्यातूनच तिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुलीच्या खोलीतून ‘अलार्म’चा आवाज येत होता. आईने खोलीत जाऊन बघितले आणि तिने मोठ्याने किंकाळी फोडली. त्यामुळे वडीलही धावत तेथे आले. मुलीला रक्ताच्या थारोळ्यात बघून दोघांच्याही तोंडातून आवाज निघत नव्हता. शेवटी कुटुंबीयांनी धंतोली पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे.

हेही वाचा...

  1. गरोदर महिलेची आत्महत्या नाही तर खून; सासरच्या मंडळींनीच हत्या केल्याचं तपासात झालं उघड
  2. शालेय साहित्य न मिळाल्यानं मुलाची आत्महत्या; तर वडिलांनी तिथंच संपवली जीवनयात्रा
  3. नागपुरात जोडप्यानं लग्नाच्या ड्रेसमध्येच केली आत्महत्या; सोशल मीडियावर व्हिडिओ ठेवून दिला शेवटचा मेसेज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.