पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात, यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी; पाहा व्हिडिओ - Jagannath Yatra 2024 - JAGANNATH YATRA 2024

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 7, 2024, 2:00 PM IST

पुरी (ओडिशा) Jagannath Rath Yatra News : ओडिशातील पुरी येथे असलेल्या जगन्नाथ मंदिराची अनेक वैशिष्ट्यं सांगितली जातात. येथील रथयात्रा जगप्रसिद्ध असून, देश-विदेशातून लाखो पर्यटक या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी येत असतात. दरवर्षी आषाढ महिन्याच्या दुसऱ्या दिवशी जगन्नाथ रथयात्रेचं आयोजन केलं जातं. यंदा 53 वर्षांनंतर ही रथयात्रा 5 विशेष शुभ मुहूर्तांसह सुरू झालीय. हा अत्यंत दुर्मिळ योगायोग मानला जातो. ग्रह-नक्षत्रांच्या गणनेनुसार यंदा दोन दिवसीय यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यापूर्वी 1971 मध्ये दोन दिवसीय यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. पंचांगानुसार, आषाढ शुक्ल द्वितीया तिथी 7 जुलैला पहाटे 3:44 वाजता सुरू झाली आहे. ही तिथी  8 जुलै रोजी पहाटे 4:14 पर्यंत राहील. त्यामुळं भाविकांना दिवसभर भगवान जगन्नाथाची पूजा करण्यासाठी चांगला मुहूर्त मिळणार आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.