शिवजयंती उत्साहात साजरी करा- मनोज जरांगे पाटील - शिवजयंती
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/18-02-2024/640-480-20780908-thumbnail-16x9-manoj-jarange-patil.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Feb 18, 2024, 3:50 PM IST
जालना Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मागील नऊ दिवसापासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत आहेत. या उपोषणादरम्यान त्यांची तब्येत खालावत चालली आहे. आज (18 फेब्रुवारी) अंतरवाली सराटी येथे आंदोलनस्थळी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील कोट्यवधी मराठा समाज बांधवांना शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्याचं आवाहन केलं. जरांगे पाटील म्हणाले, " सध्या परीक्षेचे दिवस सुरू झाले असून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झालीय. त्यामुळं आंदोलनादरम्यान कुठल्याही विद्यार्थ्यांचे पेपर बुडणार नाही किंवा ते पेपरपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेत आंदोलन करावं, असं आवाहनसुद्धा जरांगे पाटील यांनी केले. सरकारनं 20 तारखेपर्यंत मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी करावी. अन्यथा 20 तारखेनंतर आंदोलन तीव्र होईल, असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.