आरक्षण संपवण्याची भाषा केली तर जीभ हासडल्या जाईल : संजय गायकवाड यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल - Sanjay Gaikwad Slams Rahul Gandhi - SANJAY GAIKWAD SLAMS RAHUL GANDHI
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 15, 2024, 4:26 PM IST
बुलडाणा Sanjay Gaikwad Slams Rahul Gandhi : काँग्रेसचे खासदार तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात बोलताना आरक्षण हटवण्यावर कथित भाष्य केलं. राहुल गांधी यांच्या आरक्षणावरील वक्तव्याचा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी खरपूस समाचार घेतला. यावेळी बोलताना त्यांनी, आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्यांची जीभ हासडल्या जाईल, असा इशारा दिला.
संपूर्ण भारतामध्ये गोरगरीब जनता जगू शकत नव्हती, त्यांना जगण्याचा अधिकार नव्हता, हक्क नव्हता. म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये एससी, एसटी, ओबीसी, एनटी आदी समाजाला आरक्षण दिलं. आता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे. महायुती संविधान बदलणार आहे, त्यामुळे आता आरक्षण संपणार आहे, अशा बोंबा मारून काँग्रेसवाल्यांनी सगळ्या मागासवर्गीय समाजासह ओबीसी समाजाची दिशाभूल केली. आता राहुल गांधी या देशात आरक्षण संपण्याची गरज आहे, असं सांगत आहेत. तुमचा खरा चेहरा आज लोकांच्या समोर आलेला आहे. मराठा समाज पन्नास वर्षापासून आरक्षण मागत आहे. त्यांना आरक्षण द्यायच्या आधीच तुम्ही आता आरक्षण संपवणार आहे, असं सांगता. आरक्षण संपवण्याची भाषा तुम्ही करून राहिले. मागासवर्गीय आरक्षण तुम्ही संपवणार, यापुढं कोणी असो बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण संपवण्याची भाषा केली तर त्याची जीभ हासडल्या जाईल, असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षणाच्या वक्तव्यावर दिला आहे.