संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं नाशिकमध्ये उत्स्फुर्त स्वागत; पाहा व्हिडिओ - Nashik Palkhi Sohala - NASHIK PALKHI SOHALA

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 22, 2024, 1:59 PM IST

नाशिक Sant Nivruttinath Maharaj Palkhi : त्र्यंबकेश्वरकडून पंढरपूरकडं निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचं आज (22 जून) नाशिकमध्ये महापालिका, जिल्हा प्रशासनाच्या वतीनं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. विठुरायाच्या ओढीनं दरवर्षी लाखो वारकरी संत निवृत्तीनाथ पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होतात. आषाढी वारीसाठी श्री संत निवृत्तीनाथांची पालखी परंपरेनं त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडं गुरुवारी (20 जून) निघाली. सातपूर येथे मुक्काम झाल्यानंतर पंचायत समिती कार्यालय परिसरात नाशिक महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वारकऱ्यांचं स्वागत करण्यात आलं. यानंतर वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाले. निवृत्तीनाथ दिंडी सोहळ्यात दरवर्षी 70 ते 80 हजार भाविक वारकरी सहभागी होत असतात. निवृत्तीनाथांच्या पालखीतलं पहिलं गोल रिंगण सिन्नर जवळील दातली येथे पार पडणार आहे. यावेळी हजारो वारकरी हरिनामाच्या गजरात, टाळ मृदंगाच्या तालात फेर गोल रिंगण धरत विठुरायाच्या नामाचा जयजयकार करतील. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.