पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सहकुटुंब सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराचं घेतलं दर्शन, केजरीवालांच्या सुटकेसाठी केली अरदास - Bhagwant Mann In Nanded - BHAGWANT MANN IN NANDED
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 20, 2024, 9:20 PM IST
नांदेड CM Bhagwant Mann News : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज (20 ऑगस्ट) सहकुटुंब नांदेड येथील सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर भगवंत मान हे आज पहिल्यांदाच नांदेडला आले होते. यावेळी गुरुद्वाराच्या वतीनं शिरोपाव, चोला आणि तलवार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. गुरुद्वाराचं दर्शन घेण्यापूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी श्री हजूर साहिब यांच्याकडं अरविंद केजरीवालांच्या सुटकेसाठी अरदास करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच संजय सिंह आणि मनीष सिसोदिया बाहेर आले असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील निर्दोष बाहेर येतील, असा विश्वासही यावेळी भगवंत मान यांनी व्यक्त केला. आम आदमी पार्टी ही सामान्य लोकांची पार्टी असून ती कधीही तुटणार नाही, असंही ते म्हणाले.