"एकाला चणे आणि दुसऱ्याला फुटाणे... जे पेराल तेच उगवेल"; विजय वडेट्टीवारांची टीका - VIJAY WADETTIWAR
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13-01-2025/640-480-23315245-thumbnail-16x9-vijay-wadettiwar.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Jan 13, 2025, 4:17 PM IST
शिर्डी : राज्यात सध्या बदल्याच राजकारण सुरु असून यातून काहींना बदला ही मिळतो, एका खात्याचे दोन तुकडे होताना कधी पाहिलं नव्हतं. मात्र, "आता महाराष्ट्रात एकाला चणे आणि दुसऱ्याला फुटाणे असे वाटून दिले आहे जे पेराल तेच उगवेल" अशी टीका विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी संगमेनरमध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं (Radhakrishna Vikhepatil) नाव न घेता केली आहे.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार? : विजय वडेट्टीवार संगमनेर येथे बाळासाहेब थोरात यांच्या प्रेरणा दिन आणि पुरस्कार सोहळ्यासाठी आले होते. या दरम्यान भाषण करताना त्यांनी जलसंपदा खात्यातील कृष्णा, गोदावरी विखे पाटलांना तर गिरीश महाजनांना विदर्भ आणि तापी खोरे असं खात विभागून दिलं, यावर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली.