बदलापूर कीर्तन महोत्सवात 200 पखवाज वादकांची जुगलबंदी, पाहा व्हिडीओ - BADLAPUR KIRTAN FESTIVAL
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 12, 2025, 6:04 PM IST
ठाणे : बदलापुरात सुरू असलेल्या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवात शनिवारी 200 पखवाज वादकांची जुगलबंदी पाहायला मिळाली. ही जुगलबंदी याचि देही याचि डोळा अनुभवण्यासाठी वारकरी बांधवांसोबतच सर्वसामान्य बदलापूरकरांनीही मोठी गर्दी केली होती. बदलापुरात भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या वतीनं राष्ट्रीय कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला असून, यंदाचं या महोत्सवाचं 22 वे (Kirtan Festival) वर्ष आहे. यंदा समारोपाच्या आदल्या दिवशी शनिवारी पखवाज वादकांच्या जुगलबंदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मृदंगचार्य शंकरदादा मेस्त्री, एकनाथ बुवा भाग्यवंत, छगनबुवा नेमणे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 200 पखवाज वादक या जुगलबंदीत सहभागी झाले होते. ज्यात अगदी लहानग्या पखवाज वादकांचाही सहभाग होता. पखवाज वादकांची जुगलबंदी सुरू असताना वारकऱ्यांनीही ठेका धरला होता. हा सोहळा अनुभवण्यासाठी बदलापूरकरांनीही गर्दी केली होती. रविवारी (आज) काल्याच्या कीर्तनानं या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचा समारोप होणार आहे.