ETV Bharat / state

11 एकरात 35 टन रांगोळीत साकारली शिवरायांची प्रतिमा, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद - SHIVAJI MAHARAJ RANGOLI

राजमाता जिजाऊ जयंती निमित्तानं (Rajmata Jijau Jayanti 2025) कोल्हापुरातल्या वारणानगर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आजवरची सर्वात मोठी रांगोळी साकारण्यात आलीय.

Shivaji Maharaj Rangoli
शिवाजी महाराज रांगोळी (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2025, 6:07 PM IST

कोल्हापूर : कोल्हापुरातील वारणा समूहाकडून राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त (Rajmata Jijau Jayanti 2025) वारणानगर येथील तात्यासाहेब पोलीस सैनिक स्कूलच्या मैदानावर 11 एकर जागेवर 35 टन रांगोळीतून छत्रपती शिवरायांची प्रतिमा साकारण्यात आलीय. या उपक्रमात ताराराणी ब्रिगेडच्या 325 हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या, अशी माहिती आयोजक ईशानी कोरे यांनी दिलीय.

गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार नोंद : ही रांगोळी साकारण्यासाठी तब्बल एक आठवडा लागलाय. तर यापूर्वी मिर्झापूरला 3 लाख 45 हजार स्क्वेअर फुटांची रांगोळी काढून वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यात आला होता. मात्र, वारणानगर येथे साकारण्यात आलेली रांगोळी तब्बल 4.50 लाख स्क्वेअर फुटांची असल्यानं विश्व विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे.

जगातील सर्वात मोठी रांगोळी : कोल्हापुरातील वारणा उद्योग समूहाकडून राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त स्वराज्य युवा प्रतिष्ठान, ताराराणी ब्रिगेड महाराष्ट्र आणि वारणा शिक्षण समूह यांच्यावतीनं नवे पारगाव येथे तात्यासाहेब कोरे मिलिटरी स्कूल या सैनिक शाळेच्या पटांगणावर भव्य छत्रपती शिवरायांची उभी प्रतिकृती रांगोळीद्वारे साकारण्यात आलीय. ही रांगोळी तब्बल साडेचार लाख स्क्वेअर फुटांची असून, जगातील सर्वात मोठी विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात आल्याचा दावा आयोगानं केलाय. तर या कार्यक्रमाला कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रिकॉर्डच्या अधिकाऱ्यांची समिती यावेळी उपस्थित होती.

कोल्हापुरातून 110 रणरागिणी रायगडकडे रवाना : राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं कोल्हापुरातील 110 रणरागिणी महिला रायगडकडं रवाना झाल्यात. रायगडावर शिवछत्रपतींना अभिवादन करण्यासाठी शाही भगवे फेटे, भगव्या साड्या परिधान करून जय शिवराय जय जिजाऊ, असा अखंड जयघोष करीत या महिला स्वराज्याची राजधानी रायगडकडं रवाना झाल्यात. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यासह मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण झालेला शिवरायांचा पुतळा कोसळला, इंद्रजीत सावंत यांनी केला 'हा' गंभीर आरोप - statue of chhatrapati shivaji
  2. राजमाता जिजाऊ जयंती 2024; मातृतिर्थ सिंदखेड राजात अभिवादनासाठी शिवप्रेमींची तुफान गर्दी
  3. Shivaji Maharaj Statue : भारत पाकिस्तान सीमेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले . . .

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.