ETV Bharat / state

तहव्वूर राणाकडून सबळ पुरावे घ्या अन् त्याला फाशी द्या, 26/11 हल्ल्यातील पीडितांची मागणी - 2611 MUMBAI ATTACKED

राणाला कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच्याकडून सबळ पुरावे पाप्त केले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया 26/11 हल्ल्यातील पीडितांनी दिल्यात.

26/11 terrorist attack
26/11 दहशतवादी हल्ला (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 26, 2025, 4:57 PM IST

मुंबई- 26/11 हल्ल्यातील एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. मुंबई 26/11 हल्ल्यातील मुख्य सूत्रधार आणि या हल्ल्याच्या मास्टर माईंड दहशतवादी तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झालाय. दहशतवादी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारत गेल्या कित्येक वर्षांपासून पाठपुरावा करीत होता, त्याला अखेर यश आलंय. दरम्यान, दहशतवादी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारताने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळं राणाला भारतात नेण्यास अर्थात राणाच्या भारतातील प्रत्यार्पणासाठी अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवलाय. मुंबई 26/11 हल्ल्यातील मुख्य सूत्रधार आणि हल्ल्याचा मास्टर माईंड दहशतवादी तहव्वूर राणाला भारतात आणणार असल्याच्या निर्णयामुळं हल्ल्यातील पीडितानी या निर्णयाचे स्वागत केले असून, राणाला कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच्याकडून सबळ पुरावे पाप्त केले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया 26/11 हल्ल्यातील पीडितांनी दिल्यात.

निर्णयाचे स्वागतच : 26/11 हल्ल्यातील मुख्य सूत्रधार राणाच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिलाय. त्यामुळे राणाला भारतात आणले जाणार आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारत त्याचे स्वागत करीत आहे. या निर्णयामुळं 26/11 मधील बळी गेलेल्यांना न्याय मिळेल, असे बोलले जातेय. तर दुसरीकडे 26/11 च्या दिवशी रेल्वे स्टेशनवर मी होते. मला गोळी लागली होती आणि त्या घटनेचे साक्षीदार मी आहे. त्यामुळे जशी कसाबला फाशी झाली, तशी या हल्ल्यातील सूत्रधार आणि या हल्ल्याचा मुख्य नियोजन करणारा तहव्वूर राणाला जर भारतात आणले जात असेल तर त्याचे आम्ही स्वागतच करू, अशी प्रतिक्रिया 26/11 हल्ल्यातील साक्षीदार आणि गोळी लागलेल्या देविका या तरुणीने "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिलीय. परंतु राणाला फक्त भारतात आणून उपयोग नाही तर त्याच्याकडून हा हल्ला कसा केला गेला, याच्यात कोणा-कोणाचा हात आहे, याचे सगळे पुरावेही त्याच्याकडून घेतले पाहिजेत. तसेच राणाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यामुळे 26/11 हल्ल्यातील शहिदांच्या आत्म्याला शांती मिळेल, असेही देविका या तरुणीने म्हटलंय.

पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर : एकीकडे 26/11 हल्लातील जो हल्लेखोर कसाब होता, त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली. पण जो याचा मुख्य सूत्रधार आणि याचा नियोजन करणारा होता, त्या राणाला अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालय भारताच्या ताब्यात देणार आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा अमेरिकेचे अन् अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष यांचे धन्यवाद देतो, आभार मानतो. ज्याने हल्ला केला त्याला शिक्षा मिळाली. परंतु ज्याने ह्याचा कट रचला तो आता भारताच्या ताब्यात येतोय. त्यामुळे त्याला अत्यंत कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी 26/11 हल्लातील पीडित मारुती फड यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना केलीय. हा हल्ला पाकिस्तानाने केला होता. दहशतवाद्यांकडे असलेल्या बंदुकांवर पाकिस्तानचे लेबल होते. परंतु हा हल्ला आम्ही केलाच नाही, असं पाकिस्तान सातत्यानं सांगत आहे. परंतु आता मुख्य सूत्रधार राणा जर भारताच्या ताब्यात मिळाला तर त्याच्याकडून अधिक पुरावे मिळतील आणि हा हल्ला कशा प्रकारे केला गेला. हा हल्ला पाकिस्तानने केला, हे सर्व जगाला माहीत आहे. पण राणा भारतात आल्यानंतर पाकिस्तानचा आतंकवादी खरा चेहरा जगासमोर येईल, असेही या हल्ल्यातील पीडित मारुती फड यांनी म्हटलंय.

भारताचे मोठे यश : तहव्वूर राणाला भारतात आणणार असल्यानं हे एक भारतासाठी मोठे यश म्हणावं लागेल. जो या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार किंवा हल्ल्याचे नियोजन करणारा राणाला भारतात आणून फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी या हल्ल्यातील पीडित आणि "ईटीव्ही भारत"चे कॅमेरामन अनिल निर्मळ यांनी केलीय. दरम्यान, या हल्ल्याची आज जरी आठवण झाली तरी अंगावर शहारे येतात आणि कटू आठवणी ताज्या होतात. त्यामुळे अडीचशे पेक्षा अधिक निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या या नराधमांना फाशीशिवाय दुसरी कुठलीच योग्य शिक्षा नाही, असेही कॅमेरामन अनिल निर्मळ यांनी म्हटलंय.

हेही वाचा-

  1. प्रजासत्ताक दिन खास बनवण्यासाठी घरीच तयार करा या 'तिरंगी डिश'
  2. केंद्र सरकारकडून 'पद्म' पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील 'या' दिग्गजांचा सन्मान
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.