हैदराबाद Tata Curvv EV Vs Mahindra BE 6 : भारतात इलेक्ट्रिक SUV ची मागणी सतत वाढत असल्यामुळं वाहन उत्पादक कंपन्यांनी अनेक SUV बाजारात उतरवल्या आहेत. महिंद्रानं ऑटो एक्स्पो 2025 मध्ये त्यांची Mahindra BE 6 कार सादर केलीय. तर दुसरीकडं टाटा कंपनीनं त्यांची टाटा कर्व्ह EV लॉंच केलीय. या दोन्ही कारचं डिझाइन, फीचर्स, रेंज, बॅटरी, किमतीच्या बाबतीत कोणती इलेक्ट्रिक SUV खरेदी करणं चांगलं असू शकतं, चला जाणून घेऊया...
Tata Curvv EV Vs Mahindra BE 6 बॅटरी आणि रेंज
BE6 ही महिंद्रानं इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये लाँच केली आहे. जी दोन बॅटरी पॅकच्या पर्यायासह आणली आहे. त्याच्या बेस व्हेरियंट Pack One मध्ये, कंपनी 59 kWh क्षमतेची बॅटरी आहे. ज्यामुळं ती एका चार्जमध्ये 557 किमी पर्यंत रेंज देते. बॅटरीमधून 176 किलोवॅट पॉवर आणि 380 त्याच वेळी, Tata Curvv EV मध्ये 45 kWh आणि 55 kWh क्षमतेचे बॅटरी पर्याय आहेत. ज्यामध्ये लांब श्रेणीच्या प्रकाराला पूर्ण चार्ज केल्यावर 585 किमीची ARAI रेंज मिळते. त्याच वेळी, 45 kWh बॅटरीसह, त्याला 502 किमीची ARAI रेंज मिळते. 70 किलोवॅट चार्जरसह ते फक्त 40 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज करता येते. SUV ला फक्त 15 मिनिटांत 150 किमी पर्यंतची रेंज मिळते.
Tata Curvv EV Vs Mahindra BE 6 वैशिष्ट्ये
Tata Curvv EV मध्ये 450 मिमी वॉटर वेडिंग क्षमता, फ्लश डोअर हँडल्स, कनेक्टेड ॲप, LED लाईट्स, व्हेंटिलेटेड सीट्स, मल्टी ड्राइव्ह मोड्स, अँबियंट लाईट, पॅनोरॅमिक सनरूफ, पॉवर्ड टेलगेट विथ जेश्चर ॲक्टिव्हेशन, क्रूझ कंट्रोल, एअर प्युरिफायर, रेन सेन्सिंग वायपर्स, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स अशी वैशिष्ट्ये आहेत.
Mahindra BE 6
Mahindra च्या BE 6 मध्ये अनेक उत्तम वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. त्यात बाय-एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, दोन 12.3 -इंच स्क्रीन आहेत, ज्यापैकी एक इन्स्ट्रुमेंट क्लस्टर म्हणून वापरली जाते आणि दुसरी इन्फोटेनमेंट सिस्टम म्हणून वापरली जाते. यासोबतच, LED DRL, टर्न इंडिकेटर, 18 -इंच अलॉय व्हील्स, सहा स्पीकर ऑडिओ सिस्टम, OTA अपडेट, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ॲपल कार प्ले, पुश बटण स्टार्ट, टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टीअरिंग व्हील्स, टाइप सी चार्जिंग पोर्ट, क्रूझ कंट्रोल, मल्टी ड्राइव्ह मोड्स, ऑटो एसी, ऑटो हेडलॅम्प, ऑटो वायपर, कन्सोल कूलिंग स्टोरेज यांसारखी वैशिष्ट्ये यात देण्यात आली आहेत.
Tata Curvv EV Vs Mahindra BE 6 किंमत
Tata Curvv EV च्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 17.49 लाख रुपये आहे आणि त्याचा टॉप व्हेरिएंट 21.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करता येईल.
Mahindra BE 6
Mahindra ने BE 6 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 18.90 लाख रुपये आहे. त्याच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 26.90लाख रुपये आहे.
हे वाचलंत का :