मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खाननं भारतात प्रजासत्ताक दिन साजरा केल्यानंतर, रविवारी 26 जानेवारीच्या रात्री अबू धाबी येथे एका कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यानं त्याच्या आगामी 'किंग' चित्रपटाबद्दल एक मोठी माहिती उघड केली. शाहरुखनं त्याच्या आगामी चित्रपटामधील दिग्दर्शकाच्या नावाचा खुलासा केला. अबू धाबीमध्ये आयोजित ग्लोबल व्हिलेज कार्यक्रमात शाहरुख खाननं खूप धमाल केली. त्यानं स्टेजवर असणाऱ्या होस्टच्या प्रश्नांची उत्तरे देताना, त्याच्या आगामी 'किंग' चित्रपटाबद्दल एक अपडेट शेअर केली. त्याचा 'किंग' चित्रपट सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करणार असल्याचं त्यानं सांगितलं. 2023चा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पठाण' सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला होता. या कार्यक्रमात, शाहरुखनं सर्वांना सांगितलं की, त्याचा आगामी चित्रपट खूप मनोरंजक असेल.
शाहरुख खान दिली किंग चित्रपटाबद्दल विशेष माहिती : शाहरुख खानच्या एका फॅन पेजनं या कार्यक्रमातील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये 'किंग खान' म्हणतो, "मी सध्या शूटिंग करत आहे. मी काही महिने शूट करेन. माझा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद खूप कडक आहे. त्यानं पठाण बनवला होता. त्यानं मला सक्त ताकीद दिली की, आपण काय करत आहोत, हे कोणालाही सांगायचं नाही. त्यामुळे चित्रपटात काय करत आहोत हे मी सांगू शकत नाही. पण मला खात्री आहे की हे खूप मनोरंजक असेल. खूप मजा येईल."
BIG NEWS! 🎉 Shah Rukh Khan confirms @justSidAnand to direct #King! 🔥♥️ The excitement begins ❤️🔥@iamsrk @GlobalVillageAE#GlobalVillage #ShahRukhKhan #SRK #KingKhan #Dubai #DubaiGlobalVillage #SRKinDubai #King pic.twitter.com/f1I2Gv2T2W
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) January 26, 2025
शाहरुख खाननं वापरलेली शीर्षके : यानंतर 'किंग खान' पुढं म्हटलं, "मी अनेक शीर्षके वापरली आहेत, 'अशोका', 'देवदास', 'मोहब्बतें', 'प्रेम', 'प्यार', इश्क... आता आमच्याकडे शीर्षके संपली. मग 'पठाण', 'डंकी', 'जवान' आली. आता पुरे झालं, आता किंगच्या रुपात शाहरुख खानचा शोऑफ खूप झाला, पण आता आपण दुबईत आहोत आणि येथील लोकांना किंग हा, किंग वाटतो. आम्ही या चित्रपटावर कठोर परिश्रम करत आहोत."
'किंग'बद्दल : रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान स्टारर 'किंग' चित्रपटात सुहाना खान देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. 'मुंज्या' स्टार अभय वर्मा देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. यापूर्वी, किंग खाननं लोकार्नो फिल्म फेस्टिव्हल दरम्यान हा चित्रपट कोणत्या प्रकारचा असेल याबद्दल सांगितलं होतं. यावेळी शाहरुख खाननं म्हटलं होत, "हा एक अॅक्शन ड्रामा आहे, तो मनोरंजक असेल. मला बऱ्याच काळापासून असा चित्रपट करायचा होता." सध्या 'किंग' चित्रपटाची रिलीज तारीख आणि इतर तपशील अधिकृतपणे जाहीर झालेले नाही.
हेही वाचा :