बीड : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या आंदोलनाला भेट दिली. यादरम्यान त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
CDR तपासण्याची मागणी : शमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे सापडेल अस मल वाटत नाही. त्या भागातील एक इतिहास आहे. जर, तो सापडायचा असता तर पोलिसांनी त्याला कधीच पकडलं असतं. त्यामुळे मला वाटत नाही तो आता सापडेल. मी पहिल्यापासून CDR तपासण्याची मागणी करत आहे. या प्रकरणाबाबत काही ना काही सीसीटीव्ही फुटेज मिळत आहे त्याच्या माध्यामातून साखळी जुळत आहे. माध्यमांनी ते दाखवलं म्हणून ज्यांच्यावर अन्याय झाला ते पुढे येत आहे. आणखी बरेच जण पुढं येतील," असं आमदार संदीप क्षीरसागर म्हणले.
प्रशासनाला मोकळा श्वास दिला पाहिजे : "आमदार सुरेश धस आणि मी यावर पोलीस अधीक्षकांशी बोलणार आहे. वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर देखील लोक रस्त्यावर आलेत. याचा अर्थ लोकांमध्ये रोष आहे. प्रशासनाला मोकळा श्वास दिला पाहिजे. त्यामुळं धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि सरकारनं तो स्वीकारला पाहिजे. सरेंडर होण्यापासून व्हीआयपी ट्रिटमेंट झाली ती केवळ मंत्रिपद असल्यामुळंच. वाल्मिक कराडला पुण्यात कोणी रुग्णालयात दाखल केलं? त्या काळात कोण त्यांना भेटायला गेलं? याचा संपूर्ण तपास झाला पाहिजे," अशी भूमिका आमदार संदीप क्षीरसागर यांनी मांडली.
हेही वाचा :