मुंबई- 76 व्या स्वातंत्र्य दिनाचे संचलन दादरच्या शिवाजी पार्क येथे पार पडले असून, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहणही करण्यात आलंय. यानंतर राज्यपालांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राज्यपालांनी प्रजासत्ताक दिन संचलनाचे निरीक्षण केले आणि विविध पथकांकडून मानवंदना स्वीकारली. या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून दक्षिण ऑस्ट्रेलिया राज्याचे व्यापार आणि गुंतवणूक मंत्री जो झेकॅक्स उपस्थित होते.
सिडकोच्या 'सर्वांसाठी घरे' योजनेचा उल्लेख : यावेळी राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात राज्याने मागील काही वर्षांत केलेल्या प्रगतीचा आढावा सांगितला. राज्यपालांनी नवी मुंबई विमानतळासह सिडकोच्या 'सर्वांसाठी घरे' योजनेचा उल्लेख केलाय. सोबतच जैन समाजासाठी होणाऱ्या महामंडळाचादेखील राज्यपालांनी आपल्या भाषणात उल्लेख केलाय. तसेच मराठीला दिलेला अभिजात भाषेचा दर्जा, जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा या योजनांबाबतदेखील राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात भाष्य केलंय.
बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दलाचीही सहभाग : यंदाच्या संचलनामध्ये भारतीय नौदल, गोवा पोलीस, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याचे सी-60 पथक, गृहरक्षक दल (पुरुष), बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, गृहरक्षक दल (महिला), राज्य उत्पादन शुल्क विभाग, वनविभाग, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महापालिका सुरक्षा दल, सुरक्षारक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा, नागरी संरक्षण दल (पुरुष/ महिला) यांच्या कंपन्यांनी सहभाग घेतलाय.
विविध विभागांच्या चित्ररथांचा समावेश : संचलनात आयएनएस विक्रांत, भारतीय नौसेना पोत 'सुरत', 'वाघशीर' पाणबुडी, तेजस फायटर जेट, ब्राह्मोस क्षेपणास्त्र यांच्या प्रतिकृतीसुद्धा दाखविण्यात आल्यात. यंदाच्या संचलनामध्ये '24 तासांत अष्टविनायक दर्शन', वनविभागातर्फे 'आईच्या नावे एक झाड', आदिवासी विकास विभागातर्फे 'वाघबारस', मराठी भाषा विभागातर्फे 'अभिजात मराठी' यांसह विविध विभागांच्या चित्ररथांचा समावेश करण्यात आला होता.
हेही वाचा -