डॉक्टरच नव्हे तर देशातील महिलाही सुरक्षित नाहीत, पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयातील डॉक्टरांचा संताप शिगेला - Pune Doctors Protest
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 16, 2024, 5:40 PM IST
पुणे Pune Doctors Protest : कोलकात्यातील आर जी कार वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरवर बलात्कार करून जी हत्या करण्यात आली होती याच्या विरोधात आज पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून आज (16 ऑगस्ट) कमला नेहरू रुग्णालयात निषेध आंदोलन करण्यात आलं आहे. दुसरीकडे याच घटनेच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून देखील ससून रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं आहे.
कडक कायदे करण्याची गरज : यावेळी आंदोलक डॉक्टर म्हणाले की, "कोलकत्यातील आर जी कार वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरवर बलात्कार करून जी हत्या करण्यात आली आहे. त्याच्या निषेधार्थ आज आम्ही आंदोलन करत आहोत. आज देशात अशा घटना वाढत चालल्या आहेत. यात फक्त डॉक्टर नव्हे तर देशातील महिला सुरक्षित नसल्याचं समोर येत आहे. याबाबत भारत सरकारनं कडक कायदे आणले पाहिजे. तसेच मेडिकलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकालाच सुरक्षा ही मिळाली पाहिजे." यावेळी एका महिला डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे की, "आज महिला म्हणून काम करत असताना अनेक रुग्ण तसेच त्यांच्या सोबत येणारे लोक यांच्याकडून आम्हाला कधीकधी सुरक्षित वाटत नाही. अनेकांना अनेक समस्यांना सामोरं देखील जावं लागत. असं असताना आम्हाला सुरक्षा ही मिळाली पाहिजे."
हेही वाचा:
- डॉक्टर तरुणी खून बलात्कार प्रकरण : रुग्णालयात तोडफोड करणाऱ्या 19 जणांना अटक, डॉक्टर संघटनांचा संप सुरूच - Doctor Rape Murder Case
- महिला डॉक्टरांच्या खून प्रकरणात सीबीआय 5 डॉक्टरांची करणार चौकशी, आजपर्यंत काय घडलं? - DOCTOR RAPE MURDER CASE
- 'समाजात रानटीपणा असताना कसला स्वातंत्र्याचा उत्सव', कोलकाता डॉक्टर रेप मर्डर केसवर स्टार्सची प्रतिक्रिया - celebs react on kolkata rape case