बस-कारचा भीषण अपघात; आगीनं पेट घेतल्यानंतर कारमधील दोघांचा होरपळून मृत्यू - Nashik Car Bus Accident

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 4, 2024, 9:56 PM IST

नाशिक Bus And Car Accident Nashik : जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातील अक्राळे फाट्याजवळ राज्य परिवहन महामंडळाची बस आणि बोलेरो कार या दोन वाहनांचा समोरासमोर अपघात होऊन बसनं पेट घेतला. या अपघातात बोलेरो कारमधील दोघांचा होरपळून मृत्यू झाला. यावेळी बसदेखील संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवानं बसमधील प्रवासी उतरल्यानं मोठी जीवितहानी टळली. मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो कार ही नाशिककडे येत होती. तर राज्य परिवहन महामंडळाची बस कळवणाकडे जात होती. यावेळी दिंडोरी तालुक्यातील अक्राळे फाट्याजवळ दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात झाला. त्यामध्ये बसनं आणि कारनं पेट घेतल्यानं कारमधील दोघांचा होरपळून मृत्यू झाला तर बसमधील सर्व प्रवाशी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. वृत्त कळताच दिंडोरीचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्यासह दिंडोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. बसचालक बोलेरो कारला ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. ही बस कळवण आगाराची असल्याचं समजतं. मृत प्रवाशांची ओळख पटू शकली नाही. या अपघातानंतर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.