काळ आला होता, पण . . . रेल्वे ट्रॅकवर पाय घसरुन पडली महिला: दोन्ही पाय गमावले, थोडक्यात वाचला जीव - Mumbai Local Train Accident - MUMBAI LOCAL TRAIN ACCIDENT
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 9, 2024, 2:31 PM IST
नवी मुंबई Mumbai Local Train Accident : काळ आला होता, मात्र वेळ आली नव्हती, याची प्रचिती बेलापूर सीबीडी रेल्वे स्थानकातील प्रवाशांना आली. पनवेलहून ठाण्याला जाताना बेलापूर सीबीडी रेल्वे स्थानकात एक महिला पाय घसरुन पडल्यानं रेल्वेचा डबा तिच्या अंगावरून गेला. मात्र रेल्वे आणि पोलीस प्रशासनानं काही वेळातच गाडी हटवून महिलेचा प्राण वाचवला. या घटनेत महिलेनं तिचे दोन्ही पाय मात्र गमावले आहेत.
पनवेल स्थानकावरून ठाण्याकडं जाणारी लोकल बेलापूर सीबीडी रेल्वे स्थानकावर येताच एक महिला पाय घसरून रेल्वे रुळावर पडली. यावेळी ट्रॅकवर पडलेल्या महिलेच्या अंगावरुन रेल्वेचा पहिला डबा गेला. नागरिकांनी आरडाओरड करताच मोटरमननं ट्रेन मागं घेऊन थांबवली. त्यानंतर रेल्वे पोलिसांच्या मदतीनं महिलेला बाहेर काढण्यात आलं. या दुर्घटनेत महिलेचा जीव वाचला आहे, मात्र महिलेला तिचे दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. या घटनेमुळे बेलापूर रेल्वेस्थानकात मोठा गोंधळ उडाला. संबधित महिलेचं नाव कळू शकलं नाही. संबंधित महिलेला जीआरपीच्या मदतीनं रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए के जैन यांनी दिली आहे.