नवी दिल्ली IPL 2025 Schedule : आयपीएल 2025 चं वेळापत्रक जाहीर झालं असून या हंगामाची सुरुवात 22 मार्च रोजी गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यानं होईल. हा सामना कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाईल तर आयपीएल 2025 चा अंतिम सामनाही 25 मे रोजी त्याच मैदानावर खेळला जाईल. तसंच यावर्षीही काही आयपीएल सामने धर्मशाळा आणि गुवाहाटी इथं होणार आहेत. मुल्लानपूर नंतर धर्मशाळा हे पंजाब किंग्जचं दुसरं होम ग्राउंड असेल तर राजस्थान रॉयल्स जयपूर व्यतिरिक्त गुवाहाटीमध्येही सामने खेळतात.
📢 RCB VS CSK IN IPL 2025:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 16, 2025
1️⃣ 28th March - Chennai.
2️⃣ 3rd May - Bengaluru. pic.twitter.com/T0bmr9MpNM
13 ठिकाणी खेळवले जातील सामने : श्रेयस आणि रिकी पॉन्टिंग यांच्या रुपात नवीन कर्णधार आणि प्रशिक्षक असलेल्या पंजाब किंग्जचा संघ धर्मशाळेत त्यांचे तीन घरचे सामने खेळतील. हिमाचल प्रदेशच्या सुंदर मैदानावर दर हंगामात खेळल्या जाणाऱ्या दोन सामन्यांपेक्षा हे एक जास्त आहे. तसंच त्यांचे उर्वरित चार घरचे सामने पंजाबमधील मुल्लानपूर इथं खेळले जातील. 10 संघांची ही लीग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर 12 दिवसांनी 22 मार्च रोजी सुरु होईल आणि 13 ठिकाणी खेळवली जाईल. तसंच या हंगामात एकुण 74 सामने होणार असून 65 दिवस थरार चालणार आहे.
🚨 IPL 2025 Full Schedule Released! 🚨
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) February 16, 2025
🗓️ Here’s when, where, and who we’ll face in the #TataIPL2025. 🔥
We’re locking horns with CSK, RR, PBKS, KKR and DC twice. We play MI, GT, LSG and SRH once. 💪
Save the dates, 12th Man Army. We are ready to #PlayBold! 🙌 #ನಮ್ಮRCB… pic.twitter.com/92NpYAw8e3
केकेआरच्या कर्णधाराची लवकरच घोषणा : या हंगामात चेन्नईचं नेतृत्व ऋतुराज गायकवाड करेल तर मुंबईचं नेतृत्व हार्दिक पंड्या करेल. श्रेयस अय्यर पंजाब किंग्जमध्ये गेल्यानंतर, केकेआरनं अद्याप कर्णधाराची घोषणा केलेली नाही. आरसीबीचं नेतृत्व फाफ डु प्लेसिसऐवजी रजत पाटीदारकडे असेल. गेल्या वर्षी मेगा लिलाव झाला होता, त्यामुळं आयपीएल 2025 ची आतुरतेनं वाट पाहिली जात आहे. या लिलावात ऋषभ पंत सर्वात महागडा खेळाडू ठरला. पंतला लखनऊ सुपर जायंट्सनं विक्रमी 27 कोटी रुपयांना खरेदी केलं. ऋषभ पंतला नुकतंच लखनऊचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं.
Cricket's biggest rivalry is finally here, and the excitement is through the roof! Get ready for a clash like no other!
— Star Sports (@StarSportsIndia) February 16, 2025
Who will you be cheering for in this epic clash?
Watch TATA IPL Schedule announcement LIVE NOW on JioHotstar, Star Sports 1 & Star Sport 1 Hindi
📺📱 Start… pic.twitter.com/Tvp9BNUJwe
IPL 2025 चे बाद फेरीचे सामने : आयपीएल 2025 मध्ये ग्रुप स्टेजचे 70 सामने होणार आहेत. यानंतर लीगमधील अव्वल 4 संघ प्लेऑफसाठी लढतील. यावेळी प्लेऑफमधील पहिला सामना म्हणजेच क्वालिफायर-1 20 मे रोजी होणार आहे. एलिमिनेटर सामना 21 मे रोजी होणार आहे, तर क्वालिफायर-2 चा सामना 23 मे रोजी होणार आहे. अखेर 25 मे रोजी अंतिम फेरीत दोन संघ विजेतेपदासाठी भिडतील.
New captain, same hunger for the cup! 🏆❤ Bengaluru is ready to take on the season.
— Star Sports (@StarSportsIndia) February 16, 2025
Watch TATA IPL Schedule announcement LIVE NOW on JioHotstar, Star Sports 1 & Star Sport 1 Hindi
📺📱 Start Watching FREE on JioHotstar pic.twitter.com/HtlQmz8n40
कोणी किती वेळा विजेतेपद पटकावलं : IPL ची सुरुवात 2008 साली झाली. तेव्हापासून 17 हंगाम खेळले गेले आहेत. या इंडियन टी-20 लीगमधील सर्वात यशस्वी संघांमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे आघाडीवर आहेत. दोघांनी पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सने ही ट्रॉफी 3 वेळा जिंकली आहे. राजस्थान रॉयल्स, डेक्कन चार्जर्स, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबादचे संघही प्रत्येकी एकदा चॅम्पियन बनण्यात यशस्वी झाले आहेत.
हेही वाचा :