ETV Bharat / state

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरण; आरोपी हितेश मेहताला न्यायालयानं ठोठावली पोलीस कोठडी - NEW INDIA CO OPERATIVE BANK SCAM

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी हितेश मेहताला न्यायालयानं पोलीस कोठडी ठोठावली आहे. हितेश मेहताला 21 फेब्रुवारीपर्यंत कोठडी ठोठावण्यात आली.

New India Co Operative Bank Scam
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 16, 2025, 4:47 PM IST

मुंबई : टोरेस कंपनीनं गुंतवणूकदारांना चुना लावल्याची घटना ताजी असताना, आता गेल्या आठवड्यात न्यू इंडिया को-ऑपरेटीव्ह बँकेत गैरव्यवहार झाल्याचं उघड झालं. बँकेनं रिझर्व बँक ऑफ इंडियाचे कोणतेही नियम आणि निकष पालन न करता नियमबाह्य पद्धतीनं कर्ज वाटप केलं. मोठ्या प्रमाणात व्याजदर लावल्याचं प्रकरण समोर आलं. न्यू इंडिया को-ऑपरेटीव्ह बँकेत 122 कोटी रुपयांचा घोटाळा केल्या प्रकरणी आरोपी हितेश मेहताला पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली. पोलिसांनी किल्ला कोर्टात हजर केलं असता, न्यायालयानं आरोपी हितेश मेहताला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

धर्मेश पौनालाही 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील घोटाळा प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात आरोपी हितेश मेहता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दादर, माझगाव या शाखेमध्ये 122 कोटी रुपयाचा हितेश मेहता यानं घोटाळा केल्याचं समोर आलं. हितेश मेहतासोबत धर्मेश पौना याचाही हात असल्याचं समोर आलं. त्यामुळे या बँकेतील घोटाळा प्रकरणी धर्मेश पौनालाही 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी अन्य कोणाचा सहभाग आहे का? किंवा आरोपी हितेश मेहता याच्यासोबत आणखी कुणाचे या घोटाळ्यात संबंध आहेत का? याचा पुढील तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आरबीआयची बँकेवर कारवाई : घोटाळा आणि गैरव्यवहार प्रकरण समोर आल्यानंतर रिझर्व बँक ऑफ इंडियानं न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादले. या प्रकरणी बँकेला कायदेशीर नोटीस बजावली आणि बँकेत कोणतेही आर्थिक व्यवहार होणार नाहीत असं नमूद केलं. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांनी बँकेत ठेवी ठेवल्या, त्यांचे धाबे दणाणले. त्यामुळे पैसे काढण्यासाठी मागील दोन दिवसात बँकेबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडं आपले पैसे बुडणार तर नाहीत ना? या काळजीत सध्या खातेदार आहेत. परंतु मागील दोन दिवसात आपल्या खात्यावरील पैसे काढण्यासाठी न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अनेक शाखाबाहेर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचं चित्र दिसत आहे.

हेही वाचा :

  1. न्यू इंड‍िया को-ऑपरेटिव्हच्या सरव्यवस्थापकाला आर्थ‍िक गुन्हे शाखेने केली अटक, चौकशी सुरू
  2. आदर्श बँक घोटाळा प्रकरण : ठेवीदारांच्या पैशांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडवणार, इम्तियाज जलील यांचा इशारा - Imtiyaz Jaleel Warns Eknath Shinde
  3. शिखर बँक घोटाळा प्रकरण : मुंबई पोलीस आणि ईडी विशेष न्यायालयात आमने सामने - Shikhar Bank Scam Case

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.