मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाणारे दिग्गज चित्रपट निर्माते दादासाहेब फाळके यांची आज पुण्यतिथी आहे. 1944 मध्ये आजच्याच दिवशी त्यांनी या जगातून निरोप घेतला होता. 1912मध्ये फाळके फिल्म्स कंपनीची स्थापना करणारे दादासाहेब फाळके यांनी भारतातील पहिला मूकपट 'राजा हरिश्चंद्र' (1913)ची निर्मिती केली. 16 फेब्रुवारी 1944 रोजी त्यांच्या निधनाच्या इतक्या वर्षांनंतरही, दादासाहेब फाळके यांना अजूनही 'भारतीय चित्रपटाचे जनक' मानले जाते. दादासाहेब फाळके यांचा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी मुंबई प्रेसिडेन्सीच्या त्र्यंबक येथे एका मराठी भाषिक चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्याचे वडील गोविंद सदाशिव फाळके संस्कृतचे विद्वान होते. याशिवाय त्यांची आई द्वारकाबाई या गृहिणी होत्या.
दादासाहेब फाळके यांची पुण्यतिथी : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची आजही प्रेरणा घेवून दिग्दर्शक चित्रपट बनवतात. दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला आहे. त्याचे नाव चित्रपटसृष्टीत मोठ्या आदरानं घेतले जाते. दादासाहेब फाळके यांना 'द लाईफ ऑफ क्राइस्ट' पाहिल्यानंतर चित्रपट बनवण्याची कल्पना सुचली होती. त्यांच्यावर या चित्रपटाचा इतका खोलवर परिणाम झाला की, त्यांनी चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला. दादासाहेब यांना चित्रपटसृष्टीच आवड खूप होती की, त्यांनी चित्रपट बनवण्यासाठी आपल्या पत्नीचे दागिने देखील गहाण ठेवले होते. त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे बजेट 15 हजार रुपये होते. त्यांना त्याचा पहिला चित्रपट बनवण्यासाठी सुमारे 6 महिने लागले. आयुष्यभराची जमापुंजी त्यांनी चित्रपटामध्ये गुंतवली होती. 'राजा हरिश्चंद्र' या त्यांच्या पहिल्या मूकपटानंतर, त्यांनी 'भस्मासुर मोहिनी' आणि 'सावित्री' यासारखे आणखी काही पौराणिक चित्रपट तयार केले.
चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके : दादासाहेब यांचा शेवटचा मूकपट 'सेतुबंधन' होता. तसेच त्यांनी चित्रसृष्टीमधील पहिली पटकथा लिहिली. याशिवाय त्यांनी चित्रपटसृष्टीत स्त्रीयांनी देखील काम केले पाहिजे, यासाठी देखील प्रयत्न केला होता. ते त्याच्या चित्रपटातील नायिकेच्या शोधात तो रेड लाईट एरियामध्येही पोहोचले होते. त्याच्या जिद आणि चिकाटीमुळे भारतीय चित्रपटसृष्टी फुलली आहे. दरम्यान भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी 1913 मध्ये 'राजा हरिश्चंद्र' या पहिल्या भारतीय वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाची निर्मिती केल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ, भारत सरकारनं 1969 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराची स्थापना केली. दादासाहेब फाळके यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत 121 पेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती केली आहे. दरम्यान 16 फरवरी 1944मध्ये नाशिकमध्ये त्यांनी वयाच्या 73 वर्षी अखेरचा श्वास घेतला.