उद्धव ठाकरेंनी दिल्लीत कोणाचे उंबरठे झिजवले? मंत्री शंभुराज देसाई यांचा संजय राऊतांना सवाल - ShambhuRaje Desai - SHAMBHURAJE DESAI
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 11, 2024, 11:20 AM IST
नांदेड ShambhuRaj Desai Reply To Sanjay Raut : एकनाथ शिंदे हे खरे लोटांगणवीर असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देत मंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार संजय राऊत यांना सवाल केला आहे. खरे लोटांगणवीर कोण आहे हे सर्वांना माहिती आहे. उद्धव ठाकरे यांनी तीन दिवस दिल्लीत कोणाचे उंबरठे झिजवलेत, हे आधी संजय राऊत यांनी सांगावं. मुखेड येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी शंभूराज देसाई हे आज नांदेडला आले होते. विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले.
त्याला लोटांगण म्हणत नाही - देसाई : यावेळी शंभूराज देसाई यांनी ही प्रतिक्रिया दिली. बाळासाहेबांनी भाजपा सोबत हिंदुत्वाच्या विचाराशी युती केली; पण सत्तेसाठी, पदासाठी त्यांनी युती तोडून टाकली. ती पुनर्जिवीत करणासाठी आम्ही काम केलं आहे. त्याला लोटांगण म्हणत नाही, असं ते संजय राऊतांना उद्देशून म्हणाले.